Bhagyashree Injured SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhagyashree Injured : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री गंभीर जखमी; कपाळावर पडले १३ टाके, नेमकं घडलं काय?

Bhagyashree Accident News : बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी आहे. भाग्यश्री गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला दुखापत झाली असून १३ टाके पडले आहे. ही घटना कशी घडली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) कायमच चर्चेत असते. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तिने बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. यात सलमान खानचा ही समावेश आहे. मात्र आता भाग्यश्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा अपघात झाला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

अभिनेत्री भाग्यश्रीच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पिकलबॉल खेळताना भाग्यश्रीच्या डोक्याला खोच पडली आहे. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या डोक्याला तब्बल 13 टाके पडले आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाग्यश्रीला लागल्यामुळे चाहते खूप चिंतेत दिसत आहेत. भाग्यश्री लवकर बरी होण्यासाठी ते प्रार्थना करत आहेत. तसेच चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करून चिंता व्यक्त करत आहेत.

व्हायरल फोटोमध्ये भाग्यश्री हॉस्पिटलमध्ये दिसत आहे. डॉक्टर तिच्या जखमेवर उपचार करत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये भाग्यश्री तिच्या कपाळावर पडलेली खोच दाखवत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये तिच्या डोक्याला ब्रॅण्डेड लावलेले पाहायला मिळत आहे. फोटो पाहून तिचे तब्येत स्थिर असलेली दिसत आहेत.

भाग्यश्री करिअर

अभिनेत्री भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने चित्रपटात भाईजानसोबत काम केले आहे. तिचा हा चित्रपट खूप गाजला. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. चित्रपटातून सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि लोकप्रिय झाली. तिला तिच्या कामांसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT