Mazi Kanya Bhagyashree Yojana: मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत मिळणार १ लाख १ हजार रुपये; माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तरी काय?

Mazi Kanya Bhagyashree Yojana News: महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना १ लाख रुपये दिले जातात.
Mazi Kanya Bhagyashree Yojana
Mazi Kanya Bhagyashree YojanaSaam Tv
Published On

मुलींच्या शिक्षणासाठी आणि प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने मुलींसाठी योजना राबवल्या आहेत. त्याचसोबत महाराष्ट्र सरकारनेही माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेत मुलींना ५०,००० रुपये दिले जातात.

Mazi Kanya Bhagyashree Yojana
Government Schemes : आधार लिंक नाही; १० लाख लाभार्थी वंचित, निराधार, श्रावणबाळ योजनांचा लाभ बंद, VIDEO

महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच त्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. या योजनेत १८ वर्षांची होईपर्यंत पैसे दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु केली आहे. या योजनेत अनेक अटी आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेत अर्ज करणाऱ्या मुली महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेत मुलींना १ लाखांचा अपघात विमा मिळणार आहे. या योजनेत फक्त दोन मुली असतील तरच त्यांना योजनेचा लाभ घेऊ शकतात.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत अर्ज करणाऱ्या मुलींच्या पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी. या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशनधारकांना पैसे मिळतात. या योजनेत मुलींना वेगवेगळ्या वयोगटात पैसे दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये दिले जातात. सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० ररुपये दिले जातात. मुलीचे वय १८००० झाल्यानंतर ७५००० रुपये दिले जातात. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी हे पैसे दिले जातात.

Mazi Kanya Bhagyashree Yojana
Post Office Schemes: 75 रुपये दररोज बाजूला ठेवा अन् लखपती व्हा; पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम

या योजनेत मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत १ लाख १ हजार रुपये दिले जातात.या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल फोन, पासपोर्ट साइज फोटो ही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागणार आहे.हा फॉर्म महिला व बालविकास विभागाकडे जमा करावा लागणार आहे. या योजनेत मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च केला जातो.

Mazi Kanya Bhagyashree Yojana
Tax Saving Schemes: टॅक्स वाचवायचाय? या १० सरकारी योजनांना ठरतील फायद्याच्या, कर तर वाचेलच सोबत मिळेल जबरदस्त परतावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com