famous actress saam tv
मनोरंजन बातम्या

"माझ्याकडे अभिनेत्री म्हणून पाहत नाहीत...", बॉलिवूडची प्रसिद्ध Actress असं का म्हणाली?

Archana Puran Singh On Her Film Career : 'द कपिल शर्मा शो' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री अर्चना पूरन सिंहने आपल्या 'चित्रपट करिअर'बद्दल मोठे विधान केले आहे. 'द कपिल शर्मा शो'मुळे अभिनेत्रीच्या हातून मोठे प्रोजेक्ट गेल्याचे तिने सांगितले.

Shreya Maskar

अर्चना पूरन सिंहही टिव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे.

सध्या ती कपिल शर्माच्या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते.

अर्चना पूरन सिंहने आपल्या चित्रपट करिअरबद्दल मोठे विधान केले.

टिव्ही शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती 'कॉमेडी सर्कस' आणि 'द कपिल शर्मा शो'चा एक महत्त्वाचा भाग आहे. अर्चना पूरन सिंहने अलिकडेच चित्रपटांमधील संधी गमावल्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. 'द कपिल शर्मा शो' मधील त्यांच्या दीर्घ सहभागामुळे तिला अभिनयाच्या अनेक भूमिकांना मुकावे लागले असे त्यांनी सांगितले.

न्यूज १८ च्या वृत्तानुसार, 'द कपिल शर्मा शो'च्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकामुळे अर्चना पूरन सिंहला चित्रपटांचे प्रोजेक्ट हातात घेण्यासाठी क्वचितच वेळ मिळत असे. ती म्हणाली की, "इतकी वर्षे मला चित्रपटांमध्ये काम करता आले नाही. एकदा तर मला एका चित्रपटासाठी फोन आला होता. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मला २५ दिवसांकरिता स्कॉटलंडला जाणे आवश्यक होते. आधीच्या कामाच्या कमिटमेंट्समुळे मी अशा अनेक ऑफर्स नाकाराल्या आहेत."

अर्चना पूरन सिंहने पुढे सांगितले की, कपिलच्या शोचे चित्रीकरण सोडून दुसऱ्या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण करणे मला शक्य नव्हते. पूर्वी, जेव्हा हा शो टीव्हीवर प्रसारित होत असे, तेव्हा आम्ही वर्षाला शंभर एपिसोडचे चित्रीकरण करत असू. याच कारणामुळे मला इतर कशासाठीच वेळ मिळाला नाही. मला अनेक चित्रपटांना नकार द्यावा लागला आणि मी इतक्या वेळा नकार दिल्यामुळे, लोकांनी मला अभिनयाच्या कामांसाठी विचारणेच बंद केले..."

'द कपिल शर्मा शो'मुळे अर्चना पूरन सिंह यांना प्रसिद्धी मिळली असली तरी चित्रपट निर्मात्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. अभिनेत्रीने खुलासा केला की, "मी कितीही प्रयत्न केला तरीही, मी चित्रपट निर्मात्यांचे मन वळवू शकत नाहीये. मला कोणीही अभिनयाच्या भूमिका देऊ करत नाहीये. मी एक अभिनेत्री आहे यावर त्यांचा फारसा विश्वास बसत नाहीये. त्यांना अजूनही असेच वाटते की, मी म्हणजे फक्त खुर्चीवर बसून हसणारी एक व्यक्ती आहे..." असे बोलत अभिनेत्रीने खंत व्यक्त केली.

शेवटी अभिनेत्री म्हणाली की, "आता आम्ही या शोचे चित्रीकरण 'सीझन-टू-सीझन' (एका पर्वामागे दुसरे पर्व या पद्धतीने) करतो. परिणामी, मला आता वर्षभर भारतातच राहण्याची सक्ती किंवा बांधिलकी राहिलेली नाही. आता मी प्रवास करू शकते आणि इतर प्रोजक्टमध्ये सहभागी होऊ शकते. चित्रीकरण करू शकते. हा शो आता 'नेटफ्लिक्स'वर येत असल्याचा मला खूप आनंद होत आहे..."

नुकतीच अर्चना पूरन सिंह 'टोस्टर' या चित्रपटात झळकली आहे. कॉमेडी थ्रिलर चित्रपट 'टोस्टर' १५ एप्रिल २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अर्चना पूरन सिंहसोबत राजकुमार राव, सान्या मल्होत्रा, ​​फराह खान, कर्मवीर चौधरी, उपेंद्र लिमये, अभिषेक बॅनर्जी , जितेंद्र जोशी असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

Vaibhav Sooryavanshi: जिंकली आरसीबी, हवा मात्र वैभवची; मिळाले 5 अवॉर्ड्स, लाखो रूपये आणि नवी कोरी कार

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Saphale Fort : पाऊस अन् ट्रेकिंग, वीकेंडला करा सफाळेजवळील 'या' किल्ल्याची सफर

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT