Famous Actress : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

Famous Actress Passing Of Loved One : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले. अभिनेत्रीने भावुक पोस्ट शेअर करून याची माहिती दिली आहे.
Famous Actress Passing Of Loved One
Famous ActressSAAM TV
Published On
Summary

बॉलिवूडमधून दुःखद बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले.

'सैयारा' फेम बॉलिवूड अभिनेत्री अनीत पड्डावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीचे म्हणजेच तिच्या लाडक्या आजोबांचे दुःख निधन झाले आहे. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करून अनीताने ही बातमी दिली आहे. तिने आजोबांना एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहिली. तिने आजोबांचा हात हातात धरलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

अनीतने नुकतेच आपल्या आजोबांना गमावले आहे. तिच्या आयुष्यातील हा एक अत्यंत कठीण काळ सुरू आहे. तिने पोस्टमध्ये आपल्या आजोबांचे वर्णन केले आहे. त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त केले आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आणि चाहत्यांनी अभिनेत्राच्या आजोबांवर श्रद्धांजली वाहिली. चाहते अनीतला या कठीण काळात खूप पाठिंबा देत आहेत.

अनीत पड्डाची भावुक पोस्ट

"माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम.

तुम्ही माझ्यापासून दुरावत होता, तरीही तुम्ही 'मखन'ला विसरला नाहीत. तुम्ही कायम प्रेम जपले. मी कायम आठवणी आणि प्रेम या दोघांना जपून ठेवेन. तुमच्यासोबतची सर्व वर्ष, घालवलेले आनंदाचे क्षण माझ्या हृदयात साठवून ठेवीन. मी एक चांगली माणूस म्हणून जगेन. तुमचे विनोद मी माझ्या आठवणीत ठेवीन आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा ते पुन्हा पुन्हा सांगत जाईन. तुमचा दयाळूपणा आणि तुमचा प्रकाश मी प्रत्येक अंधाऱ्या खोलीत घेऊन जाईन. तुमच्या गोष्टी मी माझ्यासोबत ठेवेन आणि त्या जगाला सांगेन.

तुमचे प्रेम मी माझ्या हदयात जपून ठेवीन; कारण तुम्हीच मला प्रेमाचा सर्वात शुद्ध आणि निस्वार्थ रूप दाखवले.

मी तुम्हाला माझ्या हृदयात कायम ठेवीन.

आज आकाशात मला सर्वात तेजस्वी तारा दिसला आणि मला उमजले की, तू नक्की कुठे गेला आहेस.

माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, दादू.

माझे तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. सदैव काळाच्याही पलीकडे जाणारे प्रेम..."

अनीत पड्डा वर्कफ्रंट

२०२५ मध्ये रिलीज झालेल्या 'सैयारा' चित्रपटातून अनीत पड्डाला खूप लोकप्रियता मिळाली. तिची पडद्यावरील पहिली झलक 'सलाम वेंकी' या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेतून पाहायला मिळाली. त्यानंतर 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' या वेब सीरिजमधील आपल्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. 'सैयारा' हा चित्रपट अनीतच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. मोहित सुरी दिग्दर्शित हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने अभिनेता अहान पांडेसोबत काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.

Famous Actress Passing Of Loved One
Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com