Kiku Sharda: सुनील ग्रोव्हरनंतर कपिल शर्माचं किकू शारदासोबत बिनसलं? १३ वर्षांनंतर कॉमेडियनने सोडणार 'द कपिल शर्मा शो'; म्हणाला...

The Great Indian Kapil Show : अलीकडेच, कॉमेडियन किकू शारदाने "राईज अँड फॉल" या कार्यक्रमासाठी कपिल शर्माचा कॉमेडी शो "द ग्रेट इंडियन कपिल शो" सोडल्याची बातमी समोर आली होती. किकू शारदाने आपले मत व्यक्त केलं आहे.
The Great Indian Kapil Show
The Great Indian Kapil Show Saam Tv
Published On

Kiku Sharda ON The Great Indian Kapil Show : "द ग्रेट इंडियन कपिल शो" चा प्रसिद्ध विनोदी कलाकार किकू शारदा त्याच्या विनोदाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तो नुकताच "राईज अँड फॉल" मध्ये दिसला. "द ग्रेट इंडियन कपिल शो'मधून त्याने फार प्रसिद्धी मिळवली आणि लोकांना तो खूप आवडला. पण आता किकू या शोमध्ये नाही. अलिकडेच, अश्नीर ग्रोव्हरच्या "राईज अँड फॉल" मुळे त्याने कपिल शर्माचा कॉमेडी शो "द ग्रेट इंडियन कपिल शो" सोडल्याची बातमी समोर आली. त्याच्या शो" सोडल्याच्या अफवांवर अखेर किकू शारदाने आपले मौन सोडले आहे.

कपिल शर्मा शो सोडण्यावर किकू शारदाची प्रतिक्रिया

किकू शारदाने अलीकडेच झूमला एक मुलाखत दिली, जिथे त्याने अनेक मुद्द्यांवर उघडपणे भाष्य केले. कपिल शर्माचा शो सोडण्याच्या अफवांबद्दल बोलताना किकू म्हणाला, "हो, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला कपिलचा शो खूप आवडतो आणि मी तो कधीही सोडणार नाही."

मला स्टेजवर असण्याचा आनंद मिळतो

किकू शारदा पुढे म्हणाले, "मला हा शो खूप आवडतो. मी बाहेर आलो तेव्हा मला कळले की लोक म्हणत होते की मी शो सोडला आहे. मी का सोडेन? म्हणजे, मला तो शो खूप आवडतो. त्या स्टेजवर खूप जादुई गोष्टी घडल्या आहेत, खूप जादू निर्माण झाली आहे आणि आमच्याकडे एक अद्भुत आणि सुंदर टीम आहे. मी हे काम १३ वर्षांपासून करत आहे आणि जोपर्यंत हा शो चालू राहील तोपर्यंत मी तिथे असेन."

'राईज अँड फॉल' मधून त्याने काय शिकले?

'राईज अँड फॉल' बद्दल तो म्हणाला, मी असेही म्हणेन की हा अनुभव थकवणारा होता, पण उत्साहवर्धकही होता. हा एक मजेदार प्रवास होता, तरीही आव्हानात्मक होता. या वातावरणात लोक कसे विचार करतात याबद्दल मी बरेच काही शिकलो." किकूच्या विधानामुळे त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. लोकांना त्याचा कॉमिक टायमिंग आणि कपिल शर्मासोबतची त्याची केमिस्ट्री नेहमीच आवडली आहे. त्याच्या १३ वर्षांच्या प्रवासामुळे तो टीव्ही जगतात एक प्रसिद्ध चेहरा बनला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com