Anushka Sharma and Virat Kohli wedding anniversary post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Virat-Anushka: पश्चिमी दिल्लीचा मुलगा-दक्षिण दिल्लीची मुलगी; अनुष्काने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विराटसाठी केलेली पोस्ट चर्चेत

लग्नाच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Pooja Dange

Virat-Anushka Wedding Anniversary: अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे सेलिब्रिटी कपल आहे. या जोडप्याची काहींनी फारच रंजक आहे. एक जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झालेली ओळख थेट लग्नापर्यंत गेली. अनुष्का आणि विराट यांच्या लग्नाला आज ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने इन्स्टाग्रामवर ७ फोटो पोस्ट केले आहेत. तसेच तिने त्या प्रत्येक फोटोचे वैशिष्ट्य सुद्धा कॅप्शनमध्ये सांगितले आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'आजचा दिवस किती सुंदर आहे हे फोटो पोस्ट करून आपले नाते साजरे करण्यासाठी'. अनुष्काच्या या फोटोंवर अनेक सेलेब्रिटी कमेंट करत आहते. कतरीना कैफ, अनुराग कश्यप, सुनील ग्रोवर, मौनी रॉय तसेच खुद्द विराटनेही तिच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. तसेच त्याने म्हटले आहे, माय लव्ह, तुझ्याकडे नक्कीच माझे चांगले फोटो असतील. (Anushka Sharma)

विराट आणि अनुष्काचे लग्न इटलीमध्ये पार झालं. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. ११ डिसेंबर २०१७ला दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला ५० कोटीहून अधिक खर्च झाला होता.

विराट आणि अनुष्काला एक मुलगी आहे. जिचे नाव वामिका असे आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. त्यांच्यातील प्रेम सर्वांसमोर व्यक्त करत असतात. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. नेहमीच पर्सनल तसेच प्रोफेशनल फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (Virat Kohli)

विराट कोहली सध्या त्याच्या बांग्लादेशात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये व्यस्त होता. तर अनुष्का देखील तिच्या आगामी चित्रपट चकदा एक्सप्रेसमध्ये गुंतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT