Kangana Ranaut SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut : कंगनाने पाली हिलचा अलिशान बंगला कोट्यवधींमध्ये विकला, किती झाला नफा?

Kangana Ranaut Sells Mumbai Bungalow : भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईतील त्यांचा बंगला कोट्यवधींमध्ये विकला आहे. त्यांना किती नफा झाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता कंगना राणौत या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

भाजप खासदार (MP) आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी मुंबईतील वांद्रे पाली हिलमधील त्यांचा स्वतःचा बंगला विकला आहे. त्यांनी हा बंगल्याचा व्यवहार 32 कोटी रुपयांना केला. कंगना राणौत यांनी 2017 मध्ये हा बंगला 20 कोटी रुपयांना खरेदी केला होता. हा बंगला खूप मोठा आहे. 3,075 स्क्वेअर फूट चा आहे.

कंगना राणौत यांनी बंगल्याच्या व्यवहाराची 5 सप्टेंबर 2024 रोजी नोंदणी केली. त्यांनी मुद्रांक शुल्क (Stamp Duty Restitution) 1.92 कोटी रुपये तर 30,000 रुपये नोंदणीसाठी भरले. त्यांच्या या बंगल्याचे श्वेता बथिजा, कमलिनी होल्डिंग्जची भागीदार आहेत.

भाजपच्या लोकसभा उमेदवार कंगना रणौत यांना बंगला विकल्यामुळे 12 कोटींचा नफा झाला आहे. पाली हिलमध्ये अनेक बॉलिवूड स्टार राहतात. कंगना राणौत यांनी हा सुंदर बंगला का विकला याचे अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही आहे. कंगना राणौत यांचा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगना राणौत यांनी माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तसेच यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT