Alia Bhatt SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : आलिया भट्ट झाली ADHD ची शिकार; स्वत:च केला खुलासा, नेमका आजार काय?

Alia Bhatt is Suffering From Adhd : बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्टला ADHD हा आजार झाला आहे. या आजाराची लक्षणे जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील आलियाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. आलियाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच तिचा मोठा चाहता वर्ग आहे. 'जिगरा' च्या प्रमोशन दरम्यान तिनं दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्याला झालेल्या एका गंभीर आजाराविषयी सांगितले आहे.

आलियाने एका मिडिया मुलाखतीत तिच्या सायकोलॉजिकल टेस्टचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली की, "लहानपणी मी शाळेत असताना कोणाशीपण जास्त बोलत असले की मी कधीतरी झोन आउट व्हायची. मी काही दिवसांपूर्वी एक सायकोलॉजिकल टेस्ट केली ज्यामध्ये मला अस समजलं की, मला ADHD आहे. म्हणजे त्याची लक्षणे मला दिसत आहेत."

आलियाने ही गोष्ट जेव्हा तिच्या मित्रांना सांगितली तेव्हा ते बोले की, "हे त्यांना आधीपासूनच माहित होते." आलिया पुढे सांगते की, "तिला कॅमेरा समोर चांगले वाटते. तिला आपण स्वतः प्रेझेंटेबल असल्यासारखे वाटते. ज्यामुळे तिला योग्य भूमिका साकारण्यास मदत मिळते. " तसेच तिला राहासोबत वेळ घालवल्यावरही अशीच शांती मिळते. आलियाने शेवटी सांगितलं की, तिच्या आयुष्यात कॅमेरा आणि राहा या दोन गोष्टी आहेत ज्या पाहिल्यावर किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवल्यावर आलियाला शांतता मिळते.

ADHD म्हणजे काय?

ADHD म्हणजे अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर हा आजार होय. हा न्यूरोडेव्हलपमेंट संबंधीत आजार आहे. या आजाराचा व्यक्तीच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होताना पाहायला मिळतो. त्यांच एका कामात जास्त वेळ लक्ष लागत नाही. किंवा त्या एका ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही. म्हणूनच आलियाने तिच्या लग्नात मेकअप आर्टिस्टला 2 तासा ऐवजी 45 मिनिटात मेकअप करण्यास सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT