Alia Bhatt And Ranbir Kapoor News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranbir Alia Blessed With Girl: कपूर परिवाराला कन्यारत्न, रणबीर- आलियाचा आनंद गगनात मावेना

आलियाने मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये तिने मुलीला जन्म दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आलियाने मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये मुलीला जन्म दिला. या गोड बातमीमुळे आलिया- रणबीरसोबत कपूर आणि भट्ट कुटुंबीय आनंदात आहे.

आज सकाळी आलिया पती रणबीरसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. चाहते खूप दिवसांपासून या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते. पण दरम्यान अशीही बातमी आली होती की, अभिनेत्री नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाळाला जन्म देणार आहे.

रणबीर कपूरने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की, त्याला वडील बनायचे आहे. त्याला मुलांची खूप आवड आहे. आज सर्वजण खूप आनंदी असतील, पण रणबीरचा आनंद वेगळाच आहे. आता अभिनेत्यावर नवी जबाबदारी आली आहे. बराच वेळ कुटुंबात लहानग्या पाहुण्यांच्या आगमनाची तयारी सुरू होती. आलियाच्या घरच्यांपासून सासरचे लोकही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याचवर्षी १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले होते. दोन महिन्यांनंतरही आलियाच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता. सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना ही गुड न्युज दिली होती. अलीकडेच ते दोघे पहिल्यांदाच ब्रह्मास्त्र या चित्रपटात एकत्र दिसले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला होता.

Edit By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT