Aishwarya Rai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचे हे ९ चित्रपट तुम्हाला इमोशनल करतील

Aishwarya Rai Emotional Movie: माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायने मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंत बॉलिवूडमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Manasvi Choudhary

Edited by-Archana Chavan

माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायने मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंत बॉलिवूडमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये तिच्या नावावर अनेक उत्कृष्ट चित्रपट आहेत. आपण येथे तिचे ९ चित्रपट पाहणार आहोत जे तुम्हाला इमोशनल करतील.

ऐश्वर्या राय नावच पुरेसे आहे.  मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापासून ते बॉलिवूडची शान बनण्यापर्यंत तिने नेहमीच उत्कृष्ट काम केले आहे.  ऐश्वर्या राय सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  ती शेवटची मणिरत्नमच्या PS2 चित्रपटात दिसली होती, तेव्हापासून ती बॉलिवूडच्या फंक्शन्समध्ये दिसत आहे, परंतु चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  अशा परिस्थितीत, जर तुम्हाला ऐश्वर्या रायचे चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर पहायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला तिच्या अशा ९  चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला खरोखरच भावूक करून टाकतील.

१. देवदास

२००२मध्ये रिलीज झालेला ऐश्वर्या रायचा देवदास चित्रपट पाहून अनेक लोक भावूक झाले होते, तुम्ही हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमा ॲपवर पाहू शकता.

२. जोधा अकबर

जोधा अकबर हा देखील असाच एक ऐतिहासिक चित्रपट आहे, जो तुम्हाला भावूक करेल.  या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसले होते.  हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स, Zee5, Disney Pulse हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ वर पाहू शकता.

३.मोहब्बतें

यशराज बॅनरखाली बनलेल्या मोहब्बतें या चित्रपटात तरुण विद्यार्थ्यांची प्रेमकथा दाखवण्यात आली होती, ज्यामध्ये ऐश्वर्या आणि शाहरुखची अपूर्ण प्रेमकथाही दाखवण्यात आली होती, जी खरोखरच प्रत्येकाला भावूक करणारी होती. हा चित्रपट तुम्ही ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ वर कधीही पाहू शकता.

४.ताल

१९९९मध्ये रिलीज झालेला अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय यांचा 'ताल' चित्रपट तुम्ही ZEE5 वर कधीही घरबसल्या पाहू शकता.  हा चित्रपट पाहून तुम्हीही खूप भावूक व्हाल.

५. ए दिल है मुश्किल

ऐश्वर्या राय ही रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा सोबत २०१६ च्या ए दिल है मुश्किल चित्रपटात साइड रोलमध्ये दिसली होती.  या चित्रपटाची कथा खूपच भावूक आहे, ज्यामध्ये ऐश्वर्याची अपूर्ण प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.  हा चित्रपट Netflix, Amazon Prime Video, Apple TV, Google Play Movies आणि YouTube वर पाहता येईल.

६.खाकी

ऐश्वर्या रायचा चित्रपट खाकी यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.

७.सरबजीत

सरबजीत हा वास्तविक जीवनावर आधारित चित्रपट आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या रायने सरबजीतच्या बहिणीची भूमिका साकारली होती, जो पाकिस्तानच्या तुरुंगात बंद होता.  ऐश्वर्यासोबत या चित्रपटात रणदीप हुड्डा देखील आहे आणि हा चित्रपट खूपच भावूक आहे.  ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही सरबजीत चित्रपट पाहू शकता.

८.रेनकोट

२०२४मध्ये रिलीज झालेल्या रेनकोट या रोमँटिक ड्रामा चित्रपटात अजय देवगण आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत दिसले होते, या चित्रपटाची कथा खूपच भावूक आहे.  अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही कधीही रेनकोट चित्रपट पाहू शकता.

९.हम दिल दे चुके सनम

सलमान, ऐश्वर्या आणि अजय देवगणचा चित्रपट हम दिल दे चुके सनम १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता, हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवर आणि जिओ सिनेमावर पाहू शकता.  या चित्रपटात सलमान आणि ऐश्वर्याची अपूर्ण प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती जी तुम्हाला भावूक करेल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT