Aishwarya Rai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai: "हीची हेअरस्टाईल बदला रे...", ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या सोशल मीडियावर पुन्हा झाली ट्रोल

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या या सोहळ्यात ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या एथनिक लूकमध्ये दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aishwarya Rai Daugher Trolled: नुकताच मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे उद्घाटन झाले. या सोहळ्याला देश- विदेशातील अनेक कलावंत, सेलिब्रिटींनी, व्यवसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावलेली होती. बी- टाऊनमधील सेलिब्रिटी स्टार यांनी देखील उपस्थिती लावली होती. सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसत आहे.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या या सोहळ्यात ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या एथनिक लूकमध्ये दिसत आहेत. आई आणि मुलगी या दोघींही इतक्या सुदंर दिसत होत्या साऱ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. आराध्याचा साधेपणा जास्तीचा भाव खाऊन गेला. सोशल मीडियावर अभिनेत्रीची मुलगी आराध्या जबरदस्त चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोंवर अनेकांनी बच्चन कुंटुबातील लाडकी मुलगी इतर स्टारकिड्सप्रमाणे नसल्याचे म्हटलं आहे.

तर नेटकऱ्यांनी आराध्याला तिच्या हेअरस्टाईलवरून चांगलेच ट्रोल केले आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सने अभि-ऐशची मुलगी आराध्याच्या हेअरस्टाईलवर प्रश्न केला आहे. एका नेटकऱ्याने "पर्मनंट हेअरस्टाईल" तर आणखी एकाने "हीची हेअरस्टाईल बदला रे..." असे म्हटलं आहे. आराध्याची लहानपणापासून अशीच हेअरस्टाईल असल्याने ती ट्रोल होत आहे. आराध्या ही ट्रोलर्सच्या निशाण्यावर कायमच असते. कधी ती तिच्या स्टाईलमुळे तर कधी आईसोबतच्या तिच्या मस्तीमुळे.

ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर,अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन २ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT