Adah Sharma Net Worth Instagram
मनोरंजन बातम्या

Adah Sharma Net Worth : अदा शर्मा कोट्यवधींची मालकीण; 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Adah Sharma Birthday : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटापासून अदा शर्माने आपल्या फी मध्ये घसघशीत वाढ केली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा 'द केरला स्टोरी' चित्रपटापासून फेमस झालेली आहे. अदा शर्मा हिची या चित्रपटापासून मोठी फॅन फॉलोविंग वाढल्याचे बघायला मिळत आहे. आज अदा शर्माचा वाढदिवस आहे. ती आपल्या फॅमिलीसोबत ३१ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. अदा शर्मा मुळची मुंबईकर असून तिचा जन्म ११ मे १९९२ रोजी झालेला आहे. आज आपण अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटापासून अदा शर्माने आपल्या फी मध्ये घसघशीत वाढ केली आहे. ती एका चित्रपटासाठी जवळपास एक कोटी रुपये इतके मानधन आकारते. या चित्रपटानंतर अदा शर्मा ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’, ‘सनफ्लॉवर २’ या दोन चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

दोन्हीही चित्रपटांतील तिच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. चित्रपट आणि वेब सीरिज व्यतिरिक्त अदा शर्मा अनेक जाहिरातींमध्येही दिसते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदा शर्मा १० ते १२ कोटींची मालकीण आहे. तिचं मुंबईमध्ये अलिशान घरही आहे. यासोबतच अदाकडे अनेक अलिशान महागड्या गाड्याही आहेत.

अदाने २००८मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले. तिला चित्रपटातल्या लिसा ह्या व्यक्तिरेखेने विशेष ओळख दिली. त्यावेळी अदा अवघी १६ वर्षांची होती.

‘१९२०’ नंतर, अदा शर्मा बॉलिवूडमधून जवळजवळ गायबच झाली होती. त्यावेळी अदा टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत होती. या दरम्यान अदाने कमांडो २, कमांडो ३, एस.ओ.सत्यमुर्थी आणि चार्ली चाप्लिनसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. परंतु तिला पाहिजे तसे यश मिळाले नाही. अदा शर्माला सर्वाधिक प्रसिद्धी ‘द केरला स्टोरी’ ने दिली. या चित्रपटापासून तिच्या प्रसिद्धीत खूप मोठी वाढ झाली, त्या बरोबरच तिच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यानं कारागृहातच स्वत:ला संपवलं, अंतर्वस्त्रानंच....

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

SCROLL FOR NEXT