The Kerala Story OTT Released: अखेर ठरलं! अदा शर्माचा 'द केरला स्टोरी' OTT वर येतोय, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल चित्रपट

The Kerala Story Film: सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांना आता हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.
The Kerala Story OTT Released
The Kerala Story OTT ReleasedSaam TV
Published On

The Kerala Story OTT Released

सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' चित्रपट गेल्या वर्षी ५ मे ला रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज होताच चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला. या चित्रपटामुळे देशभरामध्ये मोठ्याप्रमाणावर गदारोळही झाला होता. चित्रपटावर अनेकांनी टीका केली असली तरी प्रेक्षकांनी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांना आता हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. नुकतंच अभिनेत्री अदा शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबद्दलची तिने माहिती दिली आहे. (Bollywood Film)

The Kerala Story OTT Released
Lokshahi Movie: राजकारणाच्या सारीपाटावर खेळून जाणार एक नवी खेळी…, 'लोकशाही' ९ फेब्रुवारीला येतोय भेटीला

गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट ओटीटीवर येईल याची चर्चा सुरू होती. पण आता अखेर हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. येत्या १६ फेब्रुवारीला झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. याबद्दलची माहिती खुद्द अभिनेत्री अदा शर्माने तिच्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे. हा चित्रपट खरंतर गेल्या वर्षी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. फार मोठ्या काळानंतर हा चित्रपट अखेर ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेमध्ये पाहता येणार आहे. (OTT)

'द केरळ स्टोरी' चित्रपटाची ओटीटी स्ट्रीमिंग तारीख जाहीर केल्यानंतर दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणतात,'एवढा संवेदनशील विषय हाताळणे काही साधी गोष्ट नाही. हे आव्हान आम्ही स्वेच्छेने स्वीकारले आहे. मात्र, प्रत्येक चित्रपट निर्मात्याला त्याच्या कामाबद्दल खात्री असते. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद माझ्यासाठी फारच खास होता. ज्यांनी हा चित्रपट अजूनही पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी आता चित्रपट ओटीटीवर रिलीज करतोय. तरीही सर्वांनीच हा चित्रपट पाहावा,अशी माझी विनंती.' (Bollywood News)

The Kerala Story OTT Released
'Mirzapur'च्या वेळी तुमच्या मुलाला सल्ला का दिला नाही?, 'Animal' वर टीका करणाऱ्या जावेद अख्तर यांना संदीप रेड्डी वंगाचा सवाल

चित्रपटाने संपूर्ण जगभरामध्ये एकूण २८८. ३३ कोटींची कमाई केली आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चित्रपटाला स्थान मिळाले. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला होता. (Bollywood Actress)

सोबतच काही राज्यांमध्ये प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारने करमुक्त चित्रपट म्हणूनही घोषणा केली. त्यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि हरियाणा या राज्यांनी तिथल्या प्रेक्षकांना टॅक्स फ्री चित्रपट दाखवला.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांचे होते. (Entertainment News)

The Kerala Story OTT Released
Tuzech Mi Geet Gaat Aahe Serial: 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेमध्ये येणार नवा ट्वीस्ट; 'सनी म्हणजे कोण ?' होणार उलगडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com