Akshay Kumar In Chatrapati Shivaji Maharaj  Saam TV
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar: छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा पहिला लूक बघून नेटकरी म्हणाले, चुकीला माफी नाही...

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Chetan Bodke

Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार'सम्राट पृथ्वीराज'नंतर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शिवभक्तांना दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून अक्षयने चाहत्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली खास झलक शेअर केली आहे.

वसीम कुरेशी यांच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनत असलेल्या या सिनेमात सुवर्ण इतिसातलं एक पान म्हणजे,शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न दाखवलं जाणार आहे. हा चित्रपट म्हणजे फक्त एक कथा नाही आणि युद्ध देखील नाही असे याचे वर्णन केले जात आहे.

या चित्रपटात हिंदू स्वराज्याचे यश आणि गौरवशाली आणि निस्वार्थ बलिदानाची कथा आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील आपली झलक शेअर करताना अक्षय कुमारने 'जय भवानी, जय शिवाजी! असे टॅगलाईन देत आपला खास फोटो शेअर केला आहे.

अक्षयच्या या ऐतिहासिक चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली असल्याचे अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले. या पोस्टमध्ये अक्षयने सांगितले, 'आज मी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या ऐतिहासिक मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे.

ज्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँ जिजाऊंच्या आशिर्वादाने मी माझ्या परीने प्रयत्न करेल.' अनेक चाहत्यांनी अक्षयला चित्रपटासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी त्याला आधीच इशारा दिला आहे.

आजपासूनच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली असून अक्षयला काही नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींनी सज्जड दम देखील दिला आहे. यावेळी अक्षयला नेटकरी म्हणतात, 'हा महाराष्ट्र आहे, इथे चुकीला माफी नाही, जपून करा' असा एकाने धमकी वजा इशारा दिला आहे.

तर दुसरा युजर म्हणतो, 'फक्त भूमिका जुळवा, नाही तर तो पृथ्वीराजसारखा होईल.' तर आणखी एकजण म्हणतो, 'महाराज, तुम्हाला हवे ते करा, महाराज पृथ्वीराज चौहान यांनी चित्रपटात जे केले ते करू नका.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT