Mohandas Sukhtankar: ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
Mohandas Sukhtankar
Mohandas SukhtankarSaam TV

Mohandas Sukhtankar: ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर (Mohandas Sukhtankar) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईतल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वर्ष नाट्यसेवा केली. तसेच त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. संस्थेत येण्यापूर्वी ते कलाकार म्हणून प्रवेश केला तर संस्थेत 'कार्यकर्ता'च्या भूमिकेत वावरले.

Mohandas Sukhtankar
Anushka Sharma: अनुष्का झाली 'घोडे पे सवार', रेट्रो लूकमध्ये नवा अंदाज

मोहनदास सुखटणकर यांनी रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड झाली, अखेरचा सवाल, दुर्गा, स्पर्श, आभाळाचे रंग आणि मस्त्यगंधा या नाटकांमध्ये भूमिका साकारली. नाटकांबरोबर मोहनदास यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही भूमिका साकारली आहे.

त्यांनी अनेक नाटकातून आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका ही विशेष गाजली होती. याशिवाय कैवारी, जावई माझा भला या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

Mohandas Sukhtankar
Deepiaka Padukone: दीपिकाला फिफा विश्वचषकात मिळाली विशेष जबबादारी, जगातील पहिल्या अभिनेत्रीने पटकावला 'हा' मान

मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी झाला होता. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टरांपैकी एक होते. त्यांच्या वडिलांनी समाजात वैद्यकीय सेवा सामाजिक कार्य म्हणूनच केले. त्यांची आईसुद्धा स्वतंत्र्य विचारसरणींच्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com