Vijay Varma Reacts To Dating Tamannaah Bhatia Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Varma Reaction On Relation: तमन्ना भाटियाने दिली प्रेमाची कबुली, पण विजय मात्र कन्फ्युज; म्हणतो “योग्य वेळ असेल तेव्हाच…”

Vijay Varma Reacts After Tamannaah confirms Relationship: तमन्नाने गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर आता विजय वर्मानेही त्यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vijay Varma Reacts To Dating Tamannaah Bhatia: बॉलिवूडमध्ये सध्या एका कपलची बरीच चर्चा सुरू आहे, कपलने नुकतंच त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. हे कपल म्हणजे तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा... तमन्नाने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. तमन्ना आणि विजयच्या नात्याबद्दल बऱ्याच अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चांवर पहिल्यांदाच तमन्नाने प्रतिक्रिया दिली होती. आता विजय वर्मानेही त्यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती.

दोघेही एकमेकांवर प्रेम करत असल्याचं सांगत त्यांनी चर्चांना पुर्णविराम दिलाय. तमन्नाने तिच्या आणि विजयच्या प्रेमाची कबुली देत त्याला आपल्या आयुष्यातील आनंदाची जागा (he is my happy place)असं म्हटलं आहे.तमन्नानंतर आता विजयनेही त्यांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. तमन्नानंतर आता विजय वर्मानेही आपल्या नात्याबद्दल मौन सोडले आहे.

विजय नेहमीच त्याच्या चित्रपटबद्दल माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतच एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी तो म्हणाला, ‘योग्य वेळ असेल तेव्हाच त्या गोष्टीवर बोललं पाहिजे. माझ्या आयुष्यात आता खूप प्रेम आहे आणि मी खूप आनंदित आहे. लोकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्हे तर कामाबद्दल बोललं पाहिजे.’

विजयने आपल्या आयुष्याबद्दल बोलताना म्हणाला की, “मी असा मुलगा नाही की पापाराझींनी मला दवाखान्याबाहेर किंवा जिमबाहेर स्पॉट करावं. माणसाने आपलं लक्ष कामाकडे द्यायला, नेहमीच माणूस त्याच्या कामातून जास्त बोलतो. माझ्याकडे अजून स्क्रिप्ट येत आहेत. त्यावर काम चालू आहे. लोक माझ्या कामाबद्दल जास्त उत्सुक आहेत.” असं स्वत: विजय म्हणाला... (Entertainment News)

तमन्ना आणि विजय हे दोघेही 'लस्ट स्टोरीज् २' च्या सेटवर एकमेकांना भेटले होते. त्यांचा गोव्यामध्ये लिपलॉक करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या रिलेशनच्या चर्चांना उधाण आलं होतं, पण आता या दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली आहे. 'लस्ट स्टोरीज् २' हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Edited By- Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT