Chhaava SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava : रिलीज आधीच 'छावा'च्या 'या' संवादांवर कात्री, सेन्सॉर बोर्डचा मोठा निर्णय

Chhaava CBFC Certification : 'छावा' चित्रपट अवघ्या दोन दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सेन्सॉर बोर्डने 'छावा' चित्रपटातील काही संवादांना कात्री लावली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' (Chhaava) 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाने रिलीज आधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बंपर कमाई करत आहे. चित्रपटातील गाण्यांनी आणि ट्रेलरने तर चाहत्यांना वेड लावले आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन देखील करत आहेत. त्यामुळे चित्रपट पहिल्या काही दिवसातच आपले बजेट वसूल करणार असल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे चित्रपटासाठी उत्सुक असताना दुसरीकडे सेन्सॉर बोर्डने चित्रपटासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. सेन्सॉर बोर्डने चित्रपटातील काही संवादांवर कात्री फिरवली आहे. हे आवश्यक बदल केल्यानंतर चित्रपट प्रदर्शत होणार आहे. तसेच आक्षेपार्ह शब्द (हरामजादा) म्यूट करण्यात आले आहेत. तसेच वयाशी संबंधित काही बदल करण्यात आले आहे.

संवादातील बदल

  • "मुगल सल्तनत का जहर" या संवादाऐवजी "'उस समय कई शासक और सल्ननत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे"

  • "खून तो आखिर मुगलों का ही है" या संवादाऐवजी "द ब्लड इज ऑफ द औरंग्स"

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला डिस्क्लेमर देण्यास सांगितले आहे. तो डिस्क्लेमर असा की, "हा चित्रपट कादंबरीवरून घेतलाय" यामुळे इतिहास जपला जाणार आहे.'छावा' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कडून U/A प्रमाणपत्र दिले आहे. सेन्सॉर बोर्डाने सांगितलेल्या बदलानंतर 'छावा' चित्रपट २ तास ४१ मिनिटे ५० सेकंदाचा झाला आहे.

'छावा' चित्रपट जवळपास 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर आहेत. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Kolhapur: पुण्यापासून कोल्हापूरला जाण्याचे सर्वोत्तम मार्ग आणि पर्याय कोणते?

Chinchpoklicha Raja: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा जल्लोषात; गणेशभक्तांची मोठी गर्दी; पाहा बाप्पाची पहिली झलक

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; महिला नेत्याकडून राजीनामा, राष्ट्रवादी अजित पवारांची देणार साथ

Julali Gaath Ga: सावी घरच्यांचा विरोध पत्करून करणार धैर्यसोबत लग्न; 'जुळली गाठ गं' मालिकेत अखेर सावी-धैर्यची जुळली सात जन्माची गाठ

Jai Vilas Palace History: ग्वाल्हेरच्या जय विलास पॅलेस भव्य राजवाड्याचा इतिहास जाणून घ्या

SCROLL FOR NEXT