Madame Tussauds In Bollywood Celebrity  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madame Tussauds: मादमा तुसॉं संग्रहालयात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पुतळ्यांची मांदियाळी, लवकरच 'या'सेलिब्रिटीचा पुतळा बनवणार

सध्या बॉलिवुड मधील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर समाधानकारक गल्ला जमवत आहे. चित्रपटाची ही कमाई कलाकारांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांना बरीच आनंददायक म्हणता येईल.

Chetan Bodke

Madame Tussauds: सध्या बॉलिवुड मधील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर समाधानकारक गल्ला जमवत आहे. चित्रपटाची ही कमाई कलाकारांनाच नाही तर त्यांच्या चाहत्यांना बरीच आनंददायक म्हणता येईल. वरुण धवन मुख्य भूमिकेत असलेला 'भेडिया' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

चित्रपटात मुख्य भूमिकेत वरुण धवनसह क्रिती सेनॉन, अभिषेक बॅनर्जी, सौरभ शुक्ला, दीपक डोबरियाल यांसारखे कलाकार मंडळी होते. या चित्रपटानिमित्त वरुणसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. सुप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांचे मेणाचे पुतळे आहेत. या पुतळ्यांमध्ये आता वरुणच्या ही पुतळ्याची भर पडली आहे.

वरुणचा मेणाचा पुतळा दिल्लीमधील DLF मॉल ऑफ इंडियाच्या चौथ्या मजल्यावर असणाऱ्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. मादाम तुसाँ संग्रहालयाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. वरुणसाठी ही बातमी आनंदाची असली तरी अवघ्या बॉलिवूडसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.

मादाम तुसाँ संग्रहालयात एवढ्या कमी वयात एका अभिनेत्याचा मेणाचा पुतळा लागलेला वरुण पहिलाच बॉलिवूड अभिनेता आहे. म्हणून वरुणवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वरुण धवनने अवघ्या काही वर्षातच बॉलिवूडमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आपले स्थान निर्माण केले आहे.

वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. वरुणने बॉलिवूडमध्ये करण जोहर दिग्दर्शित 'स्टूडेंट ऑफ द इयर' या चित्रपटातून पदार्पण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या महिला आमदाराला विषबाधा; व्हेंटिलेटरवर उपचार, प्रकृती चिंताजनक

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा नवा किरण; कॅन्सरला हरवणं शक्य, क्लिनिकल ट्रायलमध्ये शास्त्रज्ञांना मोठं यश

कारवाईनंतरही पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा; पुणे मनपा आयुक्तांचा व्यापाऱ्यांना कठोर इशारा

Fact Check: सचिन तेंडुलकरची लेक लवकरच होणार देओल कुटुंबाची सून? सनी देओलच्या मुलासोबत जोडलं नाव

Monday Horoscope: आज या राशींचे नशीब चमकणार! कोणाला मिळणार आनंदाची बातमी, तर कोणाला करावा लागणार खर्च?

SCROLL FOR NEXT