Amey Khopkar: ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ (The legend of Maula Jatt)या पाकिस्तानी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट १३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) हे कलाकार आहेत. हा चित्रपट पाकिस्तानसोबतच अन्य देशातही प्रदर्शित झाला आहे.
आता हा चित्रपट अन्य देशाप्रमाणे भारतातही प्रदर्शित होणार की नाही? असा प्रश्न अनेक चित्रपटप्रेमींना पडला होता. आता मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटाबाबत एक ट्वीट शेअर करत अनेक चित्रपट प्रेमींचे आपल्याकडे लक्ष वेधले आहे. मनसे नेते अमेय खोपकर ट्वीट करत म्हणतात, 'पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे चित्रपट पाकिस्तानमध्ये जाऊन पाहावेत.'
पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊन न देण्याबद्दल त्यांनी दोन ट्वीट केले होते, त्यातील पहिल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "फवाद खानचा ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय कंपनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घालतेय. राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही हा चित्रपट राज्यासह देशभरात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही" असे म्हटले आहे.
त्या खालोखाल आणखी एक ट्वीट त्यांनी केले आहे, त्यात ते म्हणतात, 'नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा'असा सल्ला ही यावेळी अमेय खोपकरांनी दिला आहे. सध्या या ट्वीटमुळे अमेय खोपकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मनसे नेते अमेय खोपकरांचे पाकिस्तानी सेलिब्रिटींबाबत वक्तव्य करणे, ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ही बऱ्याचदा त्यांनी पाकिस्तानी सेलिब्रिटींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' हा चित्रपट 1979मध्ये आलेल्या युनुस मलिक दिग्दर्शित ‘मौला जट’ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटातील फवाद खानच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक ही केले होते. फवाद खान आणि माहिरा खान यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. ते भारतातही खूप लोकप्रिय आहेत. त्यांची 'हमसफर' ही प्रसिद्ध मालिकाही येथे हिट झाली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.