Varun Dhawan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Varun Dhawan: वरुण धवनची रिक्षातून अनोखी सफर; चाहत्यांकडून कौतूकांचा वर्षाव !

वरुणने आपल्या मित्रांसोबत मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षाने प्रवास केला. रिक्षामध्ये बसल्यावर त्याने या प्रवासातला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आपल्या आवडत्या कलाकाराला साध्या लुकमध्ये पाहिल्यावर चाहते वर्गाला एक वेगळेच कुतूहल वाटते. बऱ्याच कलाकारांनी अनेकदा आपली लक्झरी कार सोडून कधी रिक्षा तर कधी रेल्वेनेही प्रवास केले आहे. तसेच बऱ्याचदा काही वेळा चित्रपटांचा प्रमोशनचा भाग समजून काही जणांनी रेल्वेतून प्रवास केला आहे. तसाच वरुण धवनचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. (Bollywood Actor) (Marathi Entertainment News)

नेहमीच वरुण धवन सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्याच्या मित्रांसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वरुणने आपल्या मित्रांसोबत मुंबईच्या रस्त्यांवर रिक्षाने प्रवास केला. रिक्षामध्ये बसल्यावर त्याने या प्रवासातला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. ‘स्वर्ग’ चित्रपटातील ‘बम बम बंबई’ हे गाणं त्याने या व्हिडीओवर टाकले आहे. या व्हिडीओमध्ये वरुण रिक्षामध्ये बसल्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. अनेक महागड्या गाड्या असूनही ऑटोरिक्षामध्ये बसण्याचा मोह आवरणं त्याला जमले नाही.

वरुण धवनचा ' जुग जुग जियो' हा चित्रपट जून २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. वैवाहिक जीवनातील नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाने इतकी खास कमाई बॉक्स ऑफिसवर केली नव्हती. त्याने बॉलिवूडमध्ये करण जोहरच्या ' स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून पदार्पण केले आहे. सध्या वरुणची बॉलिवुडमध्ये आघाडीचा कलाकार म्हणून ओळख आहे.

Varun Dhawan Video

आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये चॉकलेट बॉय म्हणून वावरणारा वरुण धवन या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच अवतारामध्ये दिसणार आहे. हॉरर शैलीतील त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत क्रिती सेनॉन सुद्धा दिसणार आहे. अमर कौशिक यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून वरुणने भेडियाच्या टीझरचा व्हिडीओ इन्स्टाग्राम हॅंडलवर पोस्ट केला आहे. त्याने व्हिडीओच्या कॅप्शनच्या माध्यमातून चित्रपटाचा ट्रेलर १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली. वरुण सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

SCROLL FOR NEXT