Famous Actor  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याकडे ५ कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन, नेमकं घडलं काय?

Bollywood Actor Extortion Threat : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याकडे बिश्नोई गँगच्या नावाने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा समोर आला आहे. धमकीच्या फोननंतर अभिनेत्याने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्याकडे बिश्नोई गँगच्या नावाने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा

धमकीच्या फोननंतर अभिनेत्याने मुंबई पोलिसांकडे केली तक्रार दाखल

फोन बनावट असल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय

साम टीव्ही प्रतिनिधी - संजय गडदे

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून खंडणी मागण्याचा प्रकार बॉलिवूडमध्ये घडला आहे. बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर यांच्याकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगणाऱ्या हॅरी बॉक्सर याच्या नावाने अभिनेत्याला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॅरी बॉक्सरच्या नावाने तुषार कपूरला धमकीचा फोन करण्यात आला. या फोनद्वारे त्याच्याकडे तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा दावा आहे. धमकीचा फोन आल्यानंतर तुषार कपूर यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला.

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन सेल आणि क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. धमकीच्या फोनमागील व्यक्ती कोण आहे, तसेच खंडणी मागण्याचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे.दरम्यान, क्राइम ब्रँचच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या फोनच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची तपासणी केली. पोलिसांनी धमकीच्या कॉलमधील आवाजाची हॅरी बॉक्सरच्या अधिकृत ऑडिओ नमुन्याशी तुलना केली. मात्र, दोन्ही आवाजांचे नमुने जुळले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या प्राथमिक तपासानंतर धमकीचा फोन बनावट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून खंडणी मागण्याचा हा प्रकार असू शकतो, असा तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे.तथापि, या धमकीमागील व्यक्तीची ओळख आणि संपूर्ण प्रकरणाचे सत्य अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत संजयकाका पाटलांचा एका मताने विजय; सुमनताई पाटील पराभूत

ST Employees Strike: लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप; काय आहेत मागण्या? वाचा सविस्तर...

Mumbai : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची फसवणूक! बँक खात्यातून परस्पर पैसे गायब

Running vs zumba: रनिंग की झुंबा? फिटनेससाठी कोणता व्यायाम आहे बेस्ट?

Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरूवात, तुमच्या खात्यात पैसे झाले का जमा?

SCROLL FOR NEXT