Ganpat Teaser Out Instagram/ @tigerjackieshroff
मनोरंजन बातम्या

Ganpat Teaser: दमदार ॲक्शन, उत्तम व्हिएफएक्स; बॉलिवूडच्या ॲक्शन हिरोचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ लवकरच 'गणपत' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

Chetan Bodke

Ganpat Teaser Out: बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ लवकरच 'गणपत' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच, अभिनेत्याने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये टायगरने जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे. टीझर समोर येताच चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

टायगर श्रॉफने टीझर सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा धमाकेदार टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत अभिनेत्याने लिहिले की, 'ज्या जगात दहशतीचे राज्य आहे, तिथे गणपत आपल्या लोकांचा आवाज म्हणून येत आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार उत्कृष्ट मनोरंजन! दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणार प्रेक्षकांचे फुल्ल टू मनोरंजन. टीझरमध्ये टायगर पुन्हा ॲक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून चाहते केवळ चित्रपटाचेच नव्हे तर त्याच्या बॉडीचे कौतुक करीत आहे.

हा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला आहे. काही मिनिटांतच या टीझरला २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले तर चाहत्यांनी त्याच्या टीझरवर कमेंटचा वर्षाव होत आहे. चाहत्यांना या चित्रपटाची फारच उत्सुकता होती, अखेर टीझर आल्याने त्यांची प्रतिक्षा संपली आहे.

टायगरचा हा चित्रपटही ॲक्शनने भरलेला आहे. या चित्रपटात अभिनेता क्रिती सेननसोबत दिसणार आहे. या दोघांची जोडी 'हिरोपंती' चित्रपटातही दिसली होती. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. याशिवाय टायगर 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: खुशखबर! इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी; मिळणार १,६०,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

Navi Mumbai : गुड न्यूज! नवी मुंबई एअरपोर्ट लवकरच सुरू होणार, ३० सप्टेंबरला PM मोदींच्या हस्ते उद्घाटन? |VIDEO

Crime: सासुरवाडीत जावयाची निर्घृण हत्या, घरगुती वाद मिटवताना भयंकर घडलं; चाकू अन् कुऱ्हाडीने वार नंतर...

Konkan Tourism : कोकणच्या सौंदर्यात भर घालणारा देवगड बीच, सुट्ट्यांमध्ये ट्रिप प्लान कराच

Physiotherapist Doctor title: आता फिजियोथेरेपिस्ट नावापुढे 'डॉ' लावू शकणार नाहीत; सरकारने दिले आदेश

SCROLL FOR NEXT