Suniel Shetty On Hera Pheri 3 Shooting Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suniel Shetty On Hera Pheri 3 Shooting: ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचा श्रीगणेशा कधी? सुनील शेट्टीने थेट तारीखच सांगितली

Suniel Shetty Talk About Hera Pheri 3 Film: गेल्या काही दिवसांपूर्वी ‘हेरा फेरी ३’साठी अक्षय कुमारने नकार दिल्याने कार्तिक आर्यन झळकणार अशी चर्चा होत होती. पण अशातच आता अक्षय कुमार चित्रपटात दिसणार असल्याची माहिती मिळतेय.

Chetan Bodke

Suniel Shetty On Hera Pheri 3 Shooting: परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी या त्रिकुटाने ‘हेरा फेरी’मधून चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले. ‘हेरा फेरी ३’ची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची कायमच चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर, ‘हेरा फेरी ३’साठी अक्षय कुमारने (Akshay Kumar) नकार दर्शवल्याची माहिती मिळत होता.

‘हेरा फेरी ३’च्या निर्मात्यांच्या संपर्कात कार्तिक आर्यन होता. त्याला चित्रपटाची कथा देखील आवडल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र, आता अक्षयच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने या चित्रपटाला होकार दिल्याची माहिती मिळत आहे.

नुकताच एका मुलाखतीतून, सुनील शेट्टीने चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट शेअर केले आहे. एका मुलाखतीत सुनिल शेट्टी म्हणतो, “सध्या चित्रपटाबद्दल सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे. चित्रपटाला कोणाचीही नजर लागलेली नाही, आम्ही सप्टेंबर २०२३ पासून चित्रपटाच्या शूटिंगसाठी सुरूवात करणार आहोत. शूटिंगसाठी चित्रपटातले सर्वच सेलिब्रिटी खूपच उत्साहित आहेत. आम्ही गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रोमोचं शूट पूर्ण केलं होतं. मी, अक्षय आणि परेश रावल नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असतो. आम्ही चित्रपटामुळे एकमेकांच्या नेहमीच संपर्कात असतो.”

पुढे मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, “चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही सर्वच कलाकार खूपच उत्साहित आहोत. ‘हेरा फेरी ३’हा एक बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय आणि मी जरी नेहमी भेटत नसलो तरी ही आम्ही चांगले मित्र आहोत, पण परेश रावल आणि माझी घनिष्ठ खूप चांगली मैत्री आहे. जरी आम्ही १६ वर्षांपूर्वी चित्रपटासाठी एकत्र भेटलो, तरी आमच्यातली मैत्री खूपच चांगली आहे.”

‘हेरा फेरी ३’ मध्ये फक्त अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबतच संजय दत्त देखील धमाल करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच मिळालेल्या माहितीनुसार, ‘हेरा फेरी ३’ मध्ये संजय दत्त देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. याबद्दल बोलताना संजय दत्त देखील दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Worli Vijayi Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? योग्य देखभाल कशी करावी?

Thackeray Brothers : राज-उद्धव ठाकरेंनी दोन्ही पक्ष एकत्र करावेत, विजयी मेळाव्याआधी भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT