Suniel Shetty Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Suniel Shetty Birthday : लेक असावा तर असा! वडिलांनी जिथे टेबल पुसले त्याच रेस्टॉरंटची इमारत सुनील शेट्टीने केली खरेदी

Suniel Shetty Life Struggle : अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सुनील शेट्टी आज त्याचा ६३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Chetan Bodke

सुनील शेट्टीला बॉलिवूडचा अण्णा म्हणून ओळखले जाते. अण्णा म्हणजे मोठा भाऊ. सुनील शेट्टी देखील इंडस्ट्रीतील इतर कलाकरांसाठी मोठा भाऊच आहे. सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सुनील शेट्टी आज त्याचा ६३ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुनील शेट्टीचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ ला झाला. सुनील शेट्टीचा जन्म मंगळूर (आता कर्नाटक) मधील मुल्की शहरात झाला. वयाच्या ३१ व्या वर्षी सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुनील शेट्टी गेल्या ३ दशकांपासून सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवशी आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया...

सुनील शेट्टीचा जन्म मंगळूर (आता कर्नाटक) मधील मुल्की शहरात झाला. सुनील शेट्टीच्या वडिलांचे नाव वीरप्पा शेट्टी असं आहे. त्यांना मंगळूरूमध्ये हाती काम नसल्यामुळे ते वयाच्या ९ व्या वर्षी मुंबईमध्ये पळून आले. मुंबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये ते टेबल सफाईचे काम करायचे त्याच हॉटेलचा मालक सुनील शेट्टी झाला आहे. तीन इमारती अभिनेत्याने विकत घेतल्या आहेत. अभिनेत्याच्या वडिलांना मुंबईत एका साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जॉब मिळाला होता. हॉटेलमध्ये टेबल सफाईचे काम करत असल्यामुळे अभिनेत्याच्या वडिलांना उभे राहूनच काम होते.

रात्री झोपताना सुनीलचे वडील अंथरुणावर वैगेरे नाही तर, तांदळाच्या पोत्यावर झोपायचे. अभिनेत्याच्या वडिलांनी त्यांच्या करियरच्या दिवसांत फार मेहनत घेतली. अनेक वर्ष वडिलांनी काम केल्यानंतर त्यांच्या हॉटेल मालकाने त्यांना हॉटेलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली होती. त्या हॉटेलचे जुने मालक निवृत्त झाल्यावर अभिनेत्याने त्या तिन्ही इमारती विकत घेतल्या. त्या हॉटेल पासूनच अभिनेत्याच्या वडिलांच्या करियरला सुरुवात झाल्यामुळे तेथील सर्व कर्मचारी गुण्या गोविंदाने राहतात.

अभिनेत्याने वडिलांच्या करियरबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते. ते सांगत असताना अभिनेत्याचे डोळे पाणावले होते. सुनील शेट्टी बॉलिवूडसह टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. सुनील शेट्टीने ३२ वर्षांपूर्वी १९९२ साली अभिनयात पदार्पण केलं. त्यापूर्वी सुनीलने वडिलांबरोबर केटरिंग व्यवसायात अनेक वर्षे काम केलं होतं. सुनीलचे वडील विरप्पा शेट्टी यांचं सहा वर्षांपूर्वी २०१७ मध्ये निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT