पंजाबमध्ये पूरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्त गावांना मदतीचा हात दिला आहे.
सोनू सूद पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पंजाबमध्ये पोहचला.
'रिअल लाइफ हिरो' सोनू सूद (Sonu Sood) कायम गरजूंना मदत करताना दिसतो. त्यांच्या या स्वभावामुळे प्रेक्षकवर्ग त्याचा मोठा चाहता आहे. पंजाबमधील पूरग्रस्त गावांना (Punjab Flood Affected Villages) सोनू सूदने मदतीचा हात दिला आहे. तो स्वतः पंजाबला पोहचला आहे. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
नुकताच सोनू सूदने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोनू सूद आणि त्याची सर्व टीम बोटीवरून पूरग्रस्त भागात फिरताना दिसत आहे. यात सोनू सूदसोबत स्वयंसेवक दिसत आहेत. सोनू सूद व्हिडीओत म्हणतो की, "रोटी के कर्ज को मिलकर चुकाना है..." तसेच त्याने व्हिडीओतून तेथील परिस्थिती सांगितली आहे. व्हिडीओमध्ये सोनू सूदने एक आवाहन केले आहे.
व्हिडीओत सोनू सूद म्हणतो की, "आज सकाळपासून आम्ही गावात फिरत आहोत. जेव्हा गावकऱ्यांच्या घरी जातो. तेव्हा ती लोक आम्हाला खाण्यासाठी विचारतात. दूध देऊ का? चहा देऊ का ? असे विचारतात. जो शेतकरी आपल्याला रोटी देतो. त्या शेतकऱ्याची सर्व पिक या पाण्याखाली आहेत. मात्र हे पाणी कमी होईल पण त्यांच्या गरजा वाढत जातील. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन यांना पुन्हा उभे करायचे आहे. रोटी के कर्ज को मिलकर चुकाना है..."
सोनू सूदने व्हिडीओतून पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदत मागितली आहे. सोनू सूदसोबत बॉलिवूडचे अनेक कलाकार पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. सोनू सूद गेल्याकाही दिवसांपासून पंजाबमध्ये आहे. तेथील परिस्थिती सुधारण्यास मदत करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.