Sonu Sood SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sonu Sood : "आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।"; लातूरच्या शेतकऱ्याला सोनू सूदचा मदतीचा हात

Latur Farmer : लातूरमधील एक वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे.

Shreya Maskar

सध्या सोशल मीडियावर लातूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपे (Latur Farmer) शेतात नांगरताना दिसत आहे. त्यांच्याकडे बैल नसल्यामुळे वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. या वृद्ध जोडप्याची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट असल्यामुळे त्यांना असे करावे लागत आहे. या व्हिडीओ पाहताच बॉलिवूड मधून एका अभिनेत्याने मदतीचा हात पुढे केला आहे.

बॉलिवूडचा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सोनू सूद (Sonu Sood) आहे. हा व्हिडीओ पाहून सोनू सूदने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर करून त्यावर लिहिलं की, "आप नंबर भेजिए। हम बैल भेजतें हैं।" सोनू सूदच्या या कृतीने साऱ्यांचे मन भारावून गेले आहे. सोनू सूद कायम गरजूंना मदत करताना पुढे असतो.

वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ पाहून स्थानिक प्रशासन देखील सक्रिय झाले आणि मदतीसाठी वृद्ध जोडप्याशी संपर्क साधला आहे. लातूरचे तालुका कृषी अधिकारी यांनी देखील या जोडप्याला मदत केली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी वृद्ध जोडप्याची भेट घेतली आहे. त्यांना कृषी विभागात सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या सर्व उपकरणांबद्दल सांगितले आणि लवकरच ती उपकरणे त्यांना पुरवली जाणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

लातूर जिल्ह्यातील 65 वर्षीय अंबादास पवार आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांच्याकडे बैल खरेदी करायला देखील पैसे नाही आहे. म्हणून वृद्ध आजोबा स्वतःला औताला जुंपून शेती करत आहेत. हे जोडपे लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील रहिवासी आहेत. त्यांनी सरकारकडे कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. ते अडीच एकर कोरडवाहू जमिनीचे ते मालक आहेत. खतांचा खर्च, ट्रॅक्टर, बैल परवडत नसल्यामुळे हे जोडपे शेतात राबतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! एकट्यात बसलेल्या मुलीवर वाकडी नजर; नराधमाकडून स्वतःच्या घरी नेऊन अत्याचार

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT