Shreyas Talpade On COVID Vaccine Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreyas Talpade On COVID Vaccine : कोरोना व्हॅक्सिनमुळे श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका?, अभिनेता म्हणाला, 'लस घेतल्यानंतरच मला...'

Shreyas Talpade Interview : श्रेयस तळपदेला गेल्या काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. नुकतंच अभिनेत्याने एक मुलाखत दिली आहे. त्याने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये कोरोना काळात घेतलेल्या लसीबद्दल भाष्य केले.

Chetan Bodke

Shreyas Talpade On COVID Vaccine

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे ह्याला गेल्या वर्षी १४ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त कळताच त्याच्या सेलिब्रिटी मित्रांसह, त्याच्या कुटुंबियांना आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सध्या श्रेयसची तब्येत बरी असून त्याने पुन्हा एकदा चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केली आहे. कोरोना काळात घेतलेल्या लसीबद्दल अलीकडेच श्रेयसने एका मुलाखतीत भाष्य केले आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेयस म्हणाला की, " मला माहित आहे की, मी माझ्या आहाराची, व्यायाम आणि आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतोय. मी महिन्यातून एकदाच मद्यपान करतो, तंबाखूचं व्यसन नाही. माझे कॉलेस्ट्रॉल थोडं वाढले होतं, जे की, सध्याच्या काळातील सामान्य असल्याचं मला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मी गोळ्या औषधं खायचो आणि त्यात नंतर घटही झाली होती. माझ्याकडे दुसरे कोणते कारणंही नव्हते, मला डायबिटीज नाही, बीपीचा त्रास नाही, तर मग यामागचे कारण काय असू शकते? इतकी खबरदारी घेऊनही असे घडत असेल तर त्यामागील काहीतरी वेगळं कारण असण्याची शक्यता आहे."

श्रेयस पुढे मुलाखती म्हणाला की, "मी हा सिद्धांत नाकारू शकत नाही. मी कोव्हिडची लस घेतल्यानंतर मला थोडा थकवा जाणवत होता. यात काहीतरी तथ्य असण्याची शक्यता आहे. आपण सिद्धांत नाकारू शकत नाही. कदाचित हार्टॲटेक येण्याचे लक्षण कोविड किंवा त्याची लस असण्याची शक्यता आहे, परंतु याचा संबंध तर आहे. कारण मला हार्टॲटेक कोव्हिडनंतरच आला होता."

श्रेयस मुलाखतीच्या शेवटी म्हणाला, " खरं सांगायचे तर, आपल्याला कोणालाही माहित नाही की आपण शरीरात काय टाकलं आहे. जसा सर्वांनी त्या कंपन्यांवर विश्वास ठेवला तसाच विश्वासही आपणही ठेवला. कारण, त्यापूर्वी अशी कोणतीही घटना घटली नाही. अशी घटना घडण्याचीही पहिलीच वेळ आहे. कोरोनानंतर आपण खूप घटना घडल्या आहेत, जसे की, खेळता खेळता मुलं पडल्याचे अनेक व्हिडीओजही सोशल मीडियावर आले होते. पण ही बाब खूपच भितीदायक आहे." लसीचे माझ्यावर काय परिणाम झाला आहे, ही जाणून घेण्याची मला उत्सुक आहे.

याआधीही श्रेयस तळपदेने आपल्या तब्येतीबद्दल अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. त्याच्या आजारपणात त्याला कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी खूप साथ दिली आहे, त्यामुळे श्रेयसने त्यांचे आभार मानले होते. श्रेयसच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रेयस अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये झळकला आहे. श्रेयसने 'ओम शांती ओम', 'गोलमाल' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर 'माझी तुझी रेशीमगाठी' अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

SCROLL FOR NEXT