Sharman Joshi Life Unknown Facts Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sharman Joshi Birthday : शर्मन जोशीला ‘इडियट’ नाव कसं मिळालं?; अभिनेत्याच्या करियरला ‘या’ चित्रपटांमुळे मिळाली कलाटणी!

Sharman Joshi News : अभिनेता शरमन जोशीचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याला 'इडियट' नाव कसं मिळालं ? जाणून घेऊया...

Chetan Bodke

Sharman Joshi Life Unknown Facts

अभिनेता शर्मन जोशीचा आज वाढदिवस आहे. तो आज ४४ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. सोलो हिरो म्हणून अभिनेत्याने केव्हाच बिग बजेट चित्रपट केले नाहीत. मात्र बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याच्या कायमच महत्त्वपूर्ण भूमिका असतात. सर्वांची मने जिंकणार्‍या बॉलिवूड कलाकारांच्या यादीत शरमन जोशी आघाडीत आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याला 'इडियट' नाव कसं मिळालं ? , त्यासोबतच थोडक्यात सिनेकारकिर्दिबद्दल जाणून घेऊया...

शर्मन जोशीचा जन्म २८ एप्रिल १९७९ ला मुंबईमध्ये झाला आहे. त्याच्या आई- वडीलांचे त्याने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. शर्मन जोशीला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्याने आपल्या सिनेकारकिर्दित 'रंग दे बसंती', 'गोलमाल', '३ इडियट', 'एक्सक्य़ूज मी' सारखे अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. '३ इडियट' चित्रपट शर्मन साठी खास चित्रपट ठरला होता. या चित्रपटापासूनच त्याला 'इडियट' हे नाव पडले होते. चित्रपटामध्ये त्याने राजू हे पात्र साकारले होते.

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 'फेरारी की सवारी' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याला ४० वेळा ऑडिशन द्यावे लागली होती. इतके दमदार पात्र साकारूनही अभिनेत्याला इतक्या वेळा ऑडिशन द्यावे लागलेली होती. अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, शर्मन जोशी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते प्रेम चोप्रा यांची मुलगी प्रेरणा हिच्या प्रेमात पडला होता. शर्मन-प्रेरणाची पहिली भेट कॉलेजमध्ये शिकत असताना झाली होती. पहिल्या भेटीतच शर्मनला प्रेरणा पसंत पडली होती. (Bollywood Actress)

शर्मन जोशी आणि प्रेरणा चोप्रा यांचा विवाह १५ जून २००० मध्ये झाला होता. विशेष म्हणजे ज्या वर्षी प्रेरणा आणि शर्मनचं लग्न झालं. त्याच वर्षी शर्मन जोशीला पहिला ब्रेक मिळाला होता. शर्मन-प्रेरणाला खयना, मुलगी खयना जोशी, वार्यान आणि विहान जोशी अशी दोन मुले, असे तीन मुलं त्यांना आहे. शर्मन जरीही पेशाने अभिनेता असला तरीही, प्रेरणा चोप्रा पेशाने बिझनेस वुमन आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT