Shahid Kapoor On Physical Abuse Instagram
मनोरंजन बातम्या

Shahid Kapoor On Physical Abuse: धक्कादायक! लहानपणीच शाहीद कपूरचं झालंय फिजिकल अब्युज, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Shahid Kapoor In Kabir Singh: शहिदच्या यशस्वी चित्रपटांपैकी ठरलेला ‘कबीर सिंह’ मधील भूमिकेमुळे शाहिद अजूनही ट्रोल होतो. या ट्रोलिंगवर शाहिदने नुकतंच प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Shahid Kapoor On Physical Abuse: शाहिद कपूरचा कबीर सिंग चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर शहिदच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटातील भूमिकेमुळे शाहिद अजूनही ट्रोल होतो. या ट्रोलिंगवर शाहिदने नुकतंच प्रतिक्रिया दिली आहे.

तो मुलाखतीत म्हणाला, चित्रपटात प्रेम हे फिजिकल अब्युज सारखे आहे. अशी टीका त्याच्यावर होत असताना, तो स्वतः त्याच्या बालपणात शारीरिक शोषणाचा बळी ठरला होता, तो असा विश्वास करतो की प्रेमात असताना “प्रत्येकाला दुसरी संधी मिळते.”

कबीर सिंग, संदीप रेड्डी वंगा यांच्या तेलुगू ब्लॉकबस्टर अर्जुन रेड्डीचे रुपांतर चार वर्षांनंतर हिंदी चित्रपटात करण्यात आले. त्याच्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये त्याच्या चित्रपटाची तुफान चर्चा झाली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश प्राप्त करत असताना, अनेकांनी त्याला चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला तुफान ट्रोल केले. एक रागीट व्यक्ती प्रीतीसोबत रोमँटिक क्षणांमध्ये शारीरिक अत्याचार करत होता,यावरून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. कियारा अडवाणीने त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.

शाहिद कपूरने मीड-डे या इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मी लहानपणी फिजिकल अब्युज पाहिले आहे. माझ्या चित्रपटातील एक अतिशय साधी मुलगी (प्रीती) आणि एक अतिशय हुशार, आक्रमक, चिडचिड करणारा मुलगा यांच्यातील प्रेमकथा होती. अशी लव्हस्टोरी आपण अनेकदा पाहिली आहे. ”

शाहिदने पुढे मुलाखतीत सांगितले, “मी कबीर सिंगच्या पात्राला ‘नायक’ किंवा ‘अँटी-हिरो’ म्हणून पाहिलं नाही, तर कथेतील अभिनेता म्हणून पाहिलं. प्रत्येक नायक हा चांगला माणूस आहे, असं नाही, तसा देवदास नव्हता कारण त्याने पारोचे शारीरिक शोषण केले होते.” शाहिदने मात्र देवदास हा एक उत्तम चित्रपट असल्याचे मुलाखतीत स्पष्ट केले.

शाहिद मुलाखतीच्या शेवटच्या भागात म्हणाला, “माझा मुद्दा असा आहे की, आपण सगळ्यांनीच प्रेमात चुका केल्या नाहीत का? प्रत्येक गोष्टीत आपण परफेक्ट असतो का? प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी, मग तो कितीही का उपयोगी असो किंवा नसो. ‘हा मुलगा एक महान आहे. त्याने सर्व काही करून दाखवलं’असं कोणीही म्हणत नाही.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT