Shahrukh Khan In Dubai  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: शाहरूखचा तो जुना व्हिडिओ झाला व्हायरल अन् पठाण अडकला वादाच्या भोवऱ्यात, काय आहे त्यात...?

शाहरुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमुळे सध्या तो बराच ट्रोल झाला आहे.

Chetan Bodke

Shahrukh Khan: सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याशिवाय प्रेक्षकांना चित्रपट पाहता येत नाही. सोबतच तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत जमवतो. मग तो कोणताही कलाकार असु देत. बॉलिवूड चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडणे काही पहिली गोष्ट नाही. सध्या अभिनेता शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाभोवती वाद सुरु झाला आहे. चित्रपट येत्या जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचा टीझर आणि पहिले गाणे आधीच प्रदर्शित झाले असून निर्मात्यांनी अद्यापही चित्रपटाच्या ट्रेलरची घोषणा केलेला नाही. शाहरुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख स्वत: मान्य करत आहे की, मी पाकिस्तानमधील पठाण वंशाशी संबंधित आहे. जेव्हाही पाकिस्तान जिंकतो तेव्हा मला भारत जिंकला असंच वाटतं आणि आनंदीत होतो.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून सर्व चुकीच्या कारणांमुळे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी अभिनेत्याला पाकिस्तानच्या बाजूने बोलल्याबद्दल चांगलेच ट्रोल केले आहे. काहींनी त्याच्या आगामी 'पठान' चित्रपटावरही त्याला बहिष्कार टाकण्याचे आवाहनही केले.

शाहरुख खान 4 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर 'पठाण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. त्याच्या या कमबॅकची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे, चाहते त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

पठाणमध्ये तो अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे , तर त्याच्याकडे डंकी आणि जवान सारखे चित्रपटही आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT