Jhoome Jo Pathaan Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhoome Jo Pathaan Song Out: शाहरुख- दीपिकाचे नव्या गाण्यात जबरदस्त ठुमके, 'झुमे जो पठान' गाण्यातील रोमान्स पाहून नजर हटेना...

दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून पहिल्या गाणाचा वाद बराच पेटला होता. त्यातच आता चित्रपटातील पुढील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Chetan Bodke

Jhoome Jo Pathaan Song Out: 'पठान' चित्रपटातील गेल्या काही दिवसांपूर्वी 'बेशरम रंग' हे पहिले गाणे प्रदर्शित झाले होते. गाणं प्रदर्शित होताच चित्रपटासह गाण्याला ही बॉयकॉट करण्यात यावं अशी मागणी सर्वत्र करण्यात येत होती. हा वाद दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे. दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून हा वाद बराच पेटला होता. त्यातच आता चित्रपटातील पुढील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कालच या गाण्याची घोषणा शाहरुखने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरुन घोषणा केली होती.

शाहरुख (Shahrukh Khan) आणि दीपिका (Deepika Padukone) या दोघांवरही चित्रीत झालेले हे गाणे आज सकाळी ११ वा. प्रदर्शित झाले आहे. त्या गाण्याचे नाव 'झुमे जो पठान' असे आहे. या गाण्यातही शाहरुख आणि दीपिकाची हॉट लव्ह केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. शाहरुखने या गाण्याचा फर्स्ट लूक शेअर केले होते, तेव्हा या गाण्याला बऱ्याच नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आणि त्याचे समर्थनही केले. हे गाणं हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित जानेवारी २०२३ मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Bollywood Film)

या गाण्यात शाहरुख आणि दीपिका हे दोघेही पुन्हा एकदा बोल्ड अवतारात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद गाण्यासाठी फारच उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, " 'झुमे जो पठान' हे गाणं या पात्राच्या जिद्दील सलाम करणारं गाणं आहे. गाण्यातून शाहरुख साकारत असलेल्या गुप्तहेराच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचे यातून पैलू उलगडणार आहे. या गाण्यातील शाहरुखची ती खास स्टाईल प्रत्येकाला गाण्यावर थिरकायला भाग पडते."

सोबतच या गाण्यात दीपिकाचासुद्धा हॉट, बोल्ड अंदाज आणि शाहरुख-दीपिकामधील केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. हे त्याच्या नव्या पोस्टरवरून स्पष्ट होतच होते. विशाल- शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं हे नवं गाणं कव्वाली आणि मॉडर्न फ्यूजन याचं मिश्रण असणार आहे अशी चर्चा आहे. ‘बेशरम रंग’नंतर आता ‘झुमे जो पठान’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय की यावरूनही काही वाद निर्माण होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ‘पठाण’ २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT