Pathan Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan: पठानच्या कलाकारांनी किती घेतलंय मानधन, दीपिकानं तर सलमानलाही मागं टाकलं

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटातील कलाकारांनी घेतलेल्या मानधनामुळे बरेच चर्चेत आले आहे.

Chetan Bodke

Pathan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शाहरुखसोबत या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, सलमान खान असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या बहुचर्चित चित्रपटासाठी तिन्ही दिग्गज कलाकारांनी मोठे मानधन घेतले आहे.

शाहरुख खानचा बहुचर्चित 'पठाण' चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल चार वर्षानंतर शाहरुख खान 'पठाण' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्यामुळेच शाहरुखच्या चाहत्यांना या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे. सध्या शाहरुखच्या या चित्रपटातील कलाकारांनी घेतलेल्या भरभक्कम मानधनाची चर्चा सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी शाहरुख खानने तब्बल १०० कोटी रुपये घेतले आहेत. तर दीपिका पदुकोणने १५ कोटी आणि जॉन अब्राहमने २० कोटीचे भलेमोठे मानधन घेतले आहे.

सलमान खानने नाकारले मानधन

या बहुचर्चित चित्रपटात अभिनेता सलमान खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. मात्र या भूमिकेसाठी सलमान खानने कोणतेही मानधन घेण्यास नकार दिला आहे. त्यासोबतच अभिनेत्री डिंपल कपाडियाही या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. एक्शन चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांनी ६ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

दरम्यान , पठाण सोबतच शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर डिसेंबर २०२३ मध्ये त्याचा 'डंकी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले असून या चित्रपटाचीही प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे. पठाणच्या यशासाठी काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने वैष्णौदेवीचे दर्शनही घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT