Pathan Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathan Movie: 'पठाण'चे पार्टी बॅश येणार, लवकरच करणार घोषणा

शाहरुख खान ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसमोर चित्रपटातील काही खास पार्टी बॅश सॉंग घेऊन येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pathan Movie: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) जवळपास 8 वर्षांनंतर दीपिका पदुकोणसोबत 'पठाण' या आगामी चित्रपटातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शाहरुख खान ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसमोर चित्रपटातील काही खास पार्टी बॅश सॉंग घेऊन येणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'पठाण'चा ट्रेलर येण्यापूर्वी चित्रपटातील दोन धमाकेदार गाणे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपट निर्मात्यांनी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपटातील दोन गाणी लॉन्च करण्याचे ठरवले आहे.

या वृत्ताला दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने दुजोरा दिल्याची माहितीही मिळत आहे. चित्रपटाविषयी सिद्धार्थ म्हणतो, "चित्रपटात दोन उत्तम गाणी आहेत आणि या दोन्हीही गाण्यांवर चाहते बेभान होऊन नाचणार आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी लोकांना गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्याचे आम्ही ठरवले आहे. डिसेंबर महिना सर्वांसाठी पार्टी आणि सुट्टीचा महिना असतो, त्यामुळे आम्ही चित्रपटाच्या ट्रेलरपूर्वी गाणी प्रदर्शित करीत आहे.”

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' हा एक बिग बजेट आणि अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. पुढच्या वर्षी 25 जानेवारीला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख-दीपिकासोबत जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यशराज बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटातून दीपिका-शाहरुखचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

आता 'पठाण' व्यतिरिक्त शाहरुख आणि दीपिकाच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे तर शाहरुख खान लवकरच 'जवान' आणि डंकी या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. तर दीपिका हृतिक रोशनसोबत ' फायटर' या आगामी चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

Iran Blast: इराणमध्ये मोठा स्फोट; ८ मजली निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली, संपूर्ण देशात खळबळ

दादांनी दूर ठेवलेले मुंडे, प्रकृतीमुळे बाजूला असलेले भुजबळ आता आघाडीवर, कारण काय? VIDEO

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

IND vs NZ T20: वनडेचा स्कोअर टी २० सामन्यात; न्यूझीलंडची कडक धुलाई, भारताच्या धुरंधरांनी पराभवाचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT