Sikandar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sikandar : 'सिकंदर'च्या सेटवरून पुन्हा व्हिडीओ लीक, नेमकं व्हायरल VIDEO मध्ये आहे तरी काय?

Salman Khan : सध्या सलमान खान 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात भाईजानचा 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवरून पुन्हा एक व्हिडीओ लीक झाला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा भाईजान (Salman Khan) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अलिकडेच सलमान होस्ट करत असलेला 'बिग बॉस 18' या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर दुसरीकडे आता भाईजान त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' (Sikandar) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही काळापासून चित्रपटाच्या सेटवरून अनेक व्हिडीओ लीक होताना पाहायला मिळत आहे.

आता पुन्हा एकदा 'सिकंदर' चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडीओ लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाईजान शूटिंग करताना पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खानचा स्वॅग लय भारी वाटत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान रेल्वे स्टेशनवर शूटिंग करताना पाहायला मिळत आहे. आजूबाजूला गर्दी दिसत आहे. व्हिडीओमध्ये भाईजानने काळ्या रंगाचे शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. सलमान खान पूर्ण रूबाबात चालत येताना पाहायला मिळत आहे.

सलमान खानच्या लीक व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 'सिकंदर' चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. 2025 चा हा सुपरहिट चित्रपट ठरेल असे सर्वत्र बोले जात आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'सिकंदर'हा ॲक्शन चित्रपट आहे. 'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शिन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहे.

सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सिकंदर'चित्रपटात भाईजानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील पाहायला मिळणार आहे. 'सिकंदर'चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे. चित्रपटाच्या टिझर रिलीज नंतर चाहत्यांची चित्रपटासाठी उत्कंठा वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT