Nagpur Railway News : एक चूक आणि गेम ओव्हर; रेल्वे तिकीट तपासणी करणाऱ्या बोगस टीसीच्या मुसक्या आवळल्या

Nagpur News : बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये हा तोतया टीसी लोकांची फसवणूक करत होता. तेव्हा प्रवाशांना त्याच्या वागणूकीवर संशय आला. पुढे रेल्वे पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.
Fake ticket collector caught by Nagpur Police
Fake ticket collector caught by Nagpur PoliceSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nagpur News : तिकीट तपासणीच्या नावावर सर्वसामान्यांना लुबाडणारा तोतया टीसी नागपूर रेल्वे पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. या खोट्या टीसीवर रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जीआरपीएफच्या हवाली केले आहे. बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये हा टीसी लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होता.

तोतया टीसीचे नाव संयोग कुमार साहू असे आहे. तो मूळचा रायपूरचा रहिवासी आहे. बनावट ओळखपत्र वापरुन तो प्रवाशांकडून दंड वसुली करत होता. बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस दरम्यान त्याचा फसवणूकीचा प्रकार सुरु असताना रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी टीसी ज्याप्रमाणे काळा कोट घालतात, तसा काळा कोट घालून उभा होता. त्याच्याकडे रेल्वेचे खोटे आयडी कार्ड देखील होते. तो लोकांचे तिकीट तपासण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करत होता. त्याच्या संशयास्पद वागणूकीमुळे काही प्रवाशांना शंका आली. प्रवाशांनी त्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्यांकडे केली.

Fake ticket collector caught by Nagpur Police
Walmik Karad : "मी बीड जिल्ह्याचा बाप..." वाल्मीक कराड आणि पोलिसांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून आरोपीची चौकशी केली. चौकशी सुरु असताना त्याने तोतया टीसी असल्याची कबूली दिली. पुढे रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही माहिती नागपूर रेल्वे मंडळातील सुरक्षा पथकाला दिली. पथकाने त्वरीत धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली.

Fake ticket collector caught by Nagpur Police
Shivsena UBT Protest : ST भाडेवाढ, अख्ख्या महाराष्ट्रात 'चक्काजाम'; ठाकरे गट आक्रमक, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com