Salman Khan Birthday SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan Birthday : भाईजानच्या बर्थडेचा जल्लोष; अंबानींनी आयोजित केली पार्टी, पाहा VIDEO

Salman Khan Birthday In Jamnagar : सलमान खानचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला. अंबानींनी जामनगरमध्ये भाईजानची बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

बॉलिवूडचा भाईजान (Salman Khan) ' 27 डिसेंबर'ला 59 वर्षांचा झाला. सलमान खानचा वाढदिवस खूप जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबईत सलमानने आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. तर भाईजान जामनगरमध्ये देखील मोठ्या उत्साहात बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला.

उद्योगपती अंबानी कुटुंबीयांनी (Ambani Family ) देखील भाईजानचा जबरदस्त वाढदिवस साजरा केला. अंबानी कुटुंबीयांनी सलमानच्या वाढदिवसाची पार्टी जामनगरमध्ये (Jamnagar ) आयोजित केली होती. या पार्टीला अंबानी कुटुंब, खान कुटुंब आणि इतर सेलिब्रिटी उपस्थित होते. जामनगरमधील पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सलमान खान भव्य केक कापताना पाहायला मिळत आहे. निर्माते आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांनी भाईजानच्या वाढदिवसाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर कमेंट्स आणि शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. भाईजान भाचीसोबत केक कापताना दिसत आहे.

सर्वजण मोठ्याने टाळ्या वाजवून सलमान खानला शुभेच्छा देत आहेत. तर शेवटी व्हिडीओमध्ये फटाक्यांची आतिषबाजी झालेली दिसत आहे. या पार्टीला बॉलिवूडचे अनेक मंडळी पाहायला मिळाले. काल भाईजानचा वाढदिवस मोठ्या थाटात पार पडला. सर्वत्र रोषणाई पाहायला मिळाली. तसेच केकही पाहायला खूपच सुंदर होता.

नवीन वर्षात सलमान खान 'सिकंदर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचा टीझर रिलीज केला. 'सिकंदर' हा ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट ए.आर. मुरुगादॉस यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT