Leopard: महाराष्ट्रातील बिबटे अंबानींच्या 'वनतारा'त; बिबट्याच्या हल्ल्यांनी त्रस्त झालेल्या जुन्नरकरांना दिलासा

Maharashtra Leopard: बिबट्याच्या हल्ल्यांनी हैराण झालेल्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण एक दोन नव्हे तर तब्बल 10 बिबटे गुजरातला रवाना करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व बिबचे अंबानींच्या वनतारा या प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहेत....पुणेकर बिबटे गुजराती कसे झाले त्यावरचा हा रिपोर्ट...
Leopard: महाराष्ट्रातील बिबटे अंबानींच्या 'वनतारा'त; बिबट्याच्या हल्ल्यांनी त्रस्त झालेल्या जुन्नरकरांना दिलासा
Maharashtra Leopard
Published On

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः जुन्नर वनक्षेत्रात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. नागरी वस्तीत बिबट्यांच्या हल्लेही वाढले होते. या बिबट्यांना वन विभागानं जेरबंद केलं. अखेर जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले दहा बिबटे जामनगर-गुजरात येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आले.

जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील अंबानींच्या ‘वनतारा प्राणीसंग्रहालया’त 4 मादी आणि 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यात आले आहेत. केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरणानं मान्यता दिल्यानंतर हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित अॅंम्ब्युलन्स मधून नेण्यात आले.

जुन्नर परिसरात बिबट्यांची संख्या झपाट्यानं वाढलीय. त्यामुळे हे बिबटे थेट गावं आणि वाड्यांमध्ये वावरतात.या परिसरात बिबट्यांनी शेळ्या, मेढ्यांना उचलून नेणं.लोकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. त्यामुळे जनता त्रस्त झाली होती. आता हे 10 बिबटे गुजरातला हलवल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com