Salman Khan-Rashmika Mandana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan-Rashmika Mandana: सलमान खान- रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र; या चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत

Salman Khan-Rashmika Mandana New Movie: बॉलिवूडचा भाईजान अशी सलमान खानची ओळख आहे. सलमान खानचा यावर्षी ईदचा एकही चित्रपट प्रदर्शित न झाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र, ईदच्या दिवशी सलमान खानने सिकंदर चित्रपटाची घोषणा केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडचा भाईजान अशी सलमान खानची ओळख आहे. सलमान खानचा यावर्षी ईदचा एकही चित्रपट प्रदर्शित न झाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र, ईदच्या दिवशी सलमान खानने सिकंदर चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटात सलमान खानसोबत कोणती अभिनेत्री दिसणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. तर आता सलमान खानसोबत रश्मिका मंदाना मूख्य भूमिकेत दिसणार आहे.

पिंक विलाच्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि सलमान खान ही जोडी सिकंदर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटनिर्माते लवकरच याबाबत अधिकृतपणे घोषणा करतील असे सांगण्यात येत आहे.

याबाबत Nadialwala Grandson या प्रोडक्शन हाउसच्या एक्स अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. रश्मिका मंदाना आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

रश्मिका मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिने दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रश्मिकाने डिअर कॉम्रेड, अॅनिमल, गुड बाय, पुष्पा या चित्रपटात काम केले आहे. रश्मिका चित्रपटांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. रश्मिका आणि अभिनेता विजय डेवरकोंडाच्या अफेअरच्या चर्चा अनेकदा सोशल मीडियावर होत असतात.

सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच सिकंदर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करण्यात आला होता. याबाबत पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

Manoj jarange patil protest live updates: मराठा आंदोलकांच्या घोषणा, मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

३ वाजेपर्यंतची मुदत, मनोज जरांगेंना आझाद मैदान सोडावं लागणार; कोर्टात नेमकं काय घडलं?

Actress Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीचं निधन; वयाच्या ३९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur : अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले; विवंचनेत शेतकऱ्याने आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT