Riteish Deshmukh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh : रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर, भावासारखं जपणाऱ्या जवळच्या व्यक्तीचं निधन

Riteish Deshmukh Post : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकतीच रितेशने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्याचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचे निधन झाले आहे. ज्यामुळे रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रितेश देशमुख इन्स्टाग्राम स्टोरीला त्यांचे मॅनेजर राजकुमार तिवारीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने भावुक कॅप्शन दिलं आहे. रितेशने लिहिलं की, "राजकुमार तिवारी जी आता या जगात नाहीत हे ऐकून मनाला खूप दुःख झाले. ते माझे मार्गदर्शक, माझे मोठे भाऊ, माझे कुटुंब होते. माझ्या मनोरंजनसृष्टीत पदार्पणापासून त्यांनी माझे काम सांभाळले. माझ्या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिले. मी तुम्हाला नेहमीच मिस करेन तिवारी जी - कुटुंबाप्रती, त्यांचे पुत्र सिद्धार्थ आणि सुजीत यांच्या प्रति संवेदना."

रितेश देशमुखचे मॅनेजर राजकुमार तिवारी हे त्यांच्या बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापासून त्यांच्यासोबत होते. रितेश देशमुखसाठी त्यांचे मॅनेजर कुटुंबापेक्षा कमी नव्हते. रितेशने मॅनेजर राजकुमार यांना मिठी मारल्याचा एक फोटो शेअर केला आहे. राजकुमार तिवारी यांच्या अचानक जाण्यामुळे रितेशला धक्का बसला आहे.

Riteish Deshmukh

रितेशचा पहिला चित्रपट

रितेश देशमुखने 'तुझे मेरी कसम' या 2003मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात त्याने जिनिलीयासोबत काम केले आहे. सध्या रितेश देशमुख त्याचा आगामी चित्रपट 'राजा शिवाजी'मध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT