Randeep Hooda-Lin Laishram Wedding Reception Instagram
मनोरंजन बातम्या

Randeep-Lin Wedding Reception: रणदीप-लिनच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ‘या’ दिवशी होणार, तारीख आली समोर

Randeep-Lin Wedding Reception: रणदीप आणि गर्लफ्रेंड लीनाने २९ नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली. दरम्यान, त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

Chetan Bodke

Randeep Hooda-Lin Laishram Wedding Reception

अभिनेता रणदीप हुड्डा सध्या सोशल मीडियावर त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तो गर्लफ्रेंड लिना लैशरामला डेट करत असल्याच्या चर्चा होत होत्या. सोशल मीडियावर चर्चा रंगल्यानंतर रणदीपने सोशल मीडियावर ते दोघेही लग्न करत असल्याचे पोस्टच्या माध्यमातून सांगितले. रणदीप आणि गर्लफ्रेंड लीनाने २९ नोव्हेंबर रोजी मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे मुंबईमध्ये आयोजन केले आहे.

लग्नानंतर नुकताच रणदीप आपल्या पत्नीसोबत मुंबईमध्ये दाखल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचेही मुंबई विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लग्नानंतर मुंबईमध्ये मोठी रिसेप्शन पार्टी देणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. येत्या ११ डिसेंबरला रणदीप आपल्या अनेक बॉलिवूड मित्रांना मुंबईमध्ये पार्टी देणार आहे. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थिती लावणार असल्याची माहिती मिळत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणदीप आणि लिनच्या कुटुंबाव्यतिरिक्त पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत. त्यांची रिसेप्शन पार्टी कुठे होणार आहे?, हे ठिकाण अद्यापही गुलदस्त्यात आहे. लग्नाप्रमाणे रिसेप्शन पार्टीला सुद्धा हे कपल ट्रेडिशनल एथनिक मणिपुरी ड्रेस परिधान करणार आहे. रणदीप- लीनाच्या रिसेप्शन पार्टीला कोण कोण सेलिब्रिटी उपस्थिती लावणार हे सुद्धा गुलदस्त्यातच आहे. (Bollywood News)

रणदीपप्रमाणे लिनदेखील मनोरंजनसृष्टीत ॲक्टिव्ह आहे. लिन मणिपूरची रहिवाशी असून ती एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने शाहरुखच्या 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यासोबतच मेरी कॉम, जाने जान, रंगून, मटरु की बिजली का मंडोली सह अनेक चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे.

रणदीप हुड्डाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच तो 'स्वतंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीपने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT