Saurav Ganguli Biopic Saam Tv
मनोरंजन बातम्या

Saurav Ganguli Biopic: बीसीआयच्या माजी कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, लवकरच करणार शूटिंगचा श्रीगणेशा...

सौरव ऑनस्क्रीन कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर याचं सर्वांनाच उत्तर मिळालं आहे.

Chetan Bodke

Saurav Ganguli Biopic: बॉलिवूडमध्ये अनेक क्रिकेट खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आले आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी ते कपिल देव यांच्या नावांचा समावेश आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा जीवनपटही मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. त्याने अंतिम स्क्रिप्टला होकार दिला असून लवकरच कोलकात्यात शूटिंगला सुरूवात होणार आहे, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौरव ऑनस्क्रीन कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. सौरव गांगुलीच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर बायोपिकसाठी निश्चित झाला असून तो सौरव गांगुलीची ऑनस्क्रीन भूमिका साकारणार आहे. यापूर्वी रणबीरने शूटिंगच्या तारखींबद्दल सवाल उपस्थित केले होते. मात्र आता रणबीरने होकार दिल्याचे समजते. विशेष म्हणजे सौरवने रणबीरसाठी होकार दर्शवला आहे.

२०१९ मध्ये या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर आले होते. सौरव गांगुलीची भूमिका पडद्यावर कोण भूमिका साकारणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र रणबीर कपूरचे नाव सर्वात जास्त चर्चेत असल्याचे कळत आहे.

'ऑनस्क्रीन सौरव गांगुली' कोण होणार याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सौरव गांगुलीचे चाहते करीत आहेत. बायोपिकच्या शूटिंगपूर्वी बॉलिवूड सुपरस्टार कोलकाताच्या आयकॉनिक ईडन गार्डन्स, सीएबी ऑफिस आणि सौरव गांगुलीच्या घराला भेट देऊ शकतात, असेही सूत्राने सांगितले.

रिपोर्ट्सनुसार, हा बायोपिक एक बिग बजेट चित्रपट असणार आहे, ज्याची किंमत 200-250 कोटी रुपये असेल. सौरवने आधी सांगितले होते की, तो घाईत नाही आणि शूटिंग सुरू करण्यापूर्वी सर्वकाही वस्तुस्थितीनुसार योग्य असावे अशी त्याची इच्छा आहे. आता त्याने चित्रपटाच्या अंतिम स्क्रिप्टला होकार दिला असून लवकरच कोलकात्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेत पोहचायला उशिर, शिक्षिकेने उठाबशा काढायला लावल्या; विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अजूनपर्यंत कोणताही प्रस्ताव नाही; ठाकरे बंधूंच्या आघाडीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया|VIDEO

Maharashtra Live News Update: मित्रपक्षांकडून सन्मानाने जागा न मिळाल्यास स्वबळावर लढून संघर्ष करा ! मंत्री हसन मुश्रीफ यांचा नारा

Winter Health Tips : हिवाळ्यात हाताला वारंवार घाम येतोय? लगेच करा 'हे' घरगुती उपाय

Banana Farmers In Crisis: केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली|VIDEO

SCROLL FOR NEXT