Ranbir Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं 'ब्रह्मास्त्र २' बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला...

Brahmastra 2 Big Update : रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र ' चित्रपटाने चाहत्यांना भुरळ घातली होती. आता रणबीरने 'ब्रह्मास्त्र २' बद्दल मोठी घोषणा केली आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (alia bhatt ) बॉलिवूडचे पावर कपल आहे. यांची जोडी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटादरम्यान जुळली. चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने सिनेमाला चार चाँद लावले. या दोघांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. मात्र अजूनही चाहते मात्र 'ब्रह्मास्त्र 2' ची (Brahmastra 2) आतुरतेने वाट पाहत आहे. 2022 ला 'ब्रह्मास्त्र' रिलीज झाला होता. चित्रपटाने खूप कमी वेळात मोठी लोकप्रियता मिळवली होती. आता 'ब्रह्मास्त्र 2' संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे.

'ब्रह्मास्त्र 2' कधी येणार याची माहिती बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने दिली आहे. रणबीर कपूरने आलिया भट्टचे प्री-बर्थडे सेलिब्रेशन केले. यात त्यांनी 'ब्रह्मास्त्र 2' बद्दल मोठे अपडेट दिले आहेत. सेलिब्रेशन दरम्यान पापाराझींशी गप्पा मारताना 'ब्रह्मास्त्र 2' विषयी अनेक प्रश्न केले गेले.

ब्रह्मास्त्रच्या सीक्वेल बद्दल विचारल्यावर रणबीर म्हणाला की," ब्रह्मास्त्र हे अयानचे मोठे स्वप्न आहे. खूप वर्षांपासून तो त्यावर काम करत आहे. मात्र सध्या अयान 'वॉर 2' च्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. एकदा 'वॉर 2' चित्रपट रिलीज झाला की अयान 'ब्रह्मास्त्र 2'चे प्री प्रोडक्शनचं काम सुरु करेल. पण 'ब्रह्मास्त्र 2' म्हणजे ब्रह्मास्त्रचा सीक्वेल नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात काही शंका नाही. यासंदर्भात लवकरच मोठी घोषणा होईल. "

आलिया वाढदिवस

आलिया भट्टचा वाढदिवस 15 मार्चला आहे. त्यामुळे रणबीरने आलियाच्या वाढदिवसाचे प्री-बर्थडे सेलिब्रेशन मोठ्या थाटात केले. आलियाने पापाराझींसोबत केक देखील कट केला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आलिया आणि रणबीरला क्यूट लेक राहा आहे. राहाच्या क्यूट लूकचे तर चाहते दिवाने आहेत. मात्र नुकतेच आलियाने राहाचे सोशल मीडियावरील सर्व फोटो हटवले आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा लवकरच 'लव्ह अँड वॉर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरसोबत 'छावा' फेम अभिनेता विकी कौशलही पाहायला मिळणार आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार आहेत. चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया,रणबीर आणि विकी हे त्रिकूट पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

SCROLL FOR NEXT