Rajpal Yadav News Sam tv
मनोरंजन बातम्या

एक चूक नडली, प्रसिद्ध अभिनेत्याची तुरुंगात रवानगी झाली; सिनेसृष्टीत खळबळ

Rajpal Yadav News : प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव तुरुंगात गेला आहे. यादव तरुंगात गेल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगात गेलाय

दिल्ली हायकोर्टाने सरेंडरचे आदेश दिलेत

५ कोटींच्या कर्ज प्रकरणामुळे राजपाल तुरुंगात पोहोचला

प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवला एक चूक महागात पडली आहे. दिल्ली हायकोर्टाने २ फेब्रुवारी रोजी अभिनेता राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगात सरेंडर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज गुरुवारी राजपालने तिहार जेलच्या सुपरिटेंडेंटसमोर आत्मसमर्पण केलं. राजपालने एका याचिका दाखल करून काही दिवसांची सूट मागितली होती. परंतु ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने राजपालला दिलासा मिळाला नाही. त्यानंतर राजपाल यादवने तुरुंगात जाऊन सरेंडर केलं.

राजपाल यादव दिल्लीच्या हायकोर्टात सुनावणीदरम्यान हजर राहिला होता. त्यावेळी राजपाल यादव २५ लाखांचा चेक घेऊन आला होता. ५ कोटींमधील उर्वरित पैसे लवकरच परत करेल. त्यामुळे दिलासा देण्याची मागणी राजपालने केली. परंतु कोर्टाने राजपालला सरेंडर होण्याची आदेश दिले होते.

कोर्टाने म्हटलं होतं की, 'जे लोक कायद्याचा सन्मान करत नाहीत. त्यांना कोणतीही दया दाखवता कामा नये. कायद्याचं पालन करणाऱ्याला कोर्ट दिलासा देतं. त्याचा अवमान करणाऱ्यांना नाही'.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राजपाल यादवचं संपूर्ण प्रकरण २०१० सालात घडलेलं प्रकरण आहे. राजपालने डेब्यू फिल्म 'अता पता लापता' यासाठी मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीकडून ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. परंतु राजपालने घेतलेलं कर्ज फेडलं नाही. अनेकदा कर्ज फेडण्यासाठी दिलेले चेक बाऊन्स झाले. त्यानंतर कंपनीने अभिनेता राजपाल यादवच्या विरोधात कोर्टात धाव घेतली.

राजपाल चेक बाउन्स प्रकरणात दोषी आढळला. ट्रायल कोर्टाने या प्रकरणात राजपाल यादवला ६ महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. परंतु राजपालने कोर्टात २०२४ साली दाद मागितल्यानंतर शिक्षेला स्थगिती दिली होती. यावेळी राजपालने तक्रारकर्त्याला पैसे देण्याचे मान्य केले होते. परंतु राजपालने पैसे कंपनीला दिले नाही. त्यानंतर दिल्ली हायकोर्टाने राजपाल यादवला सरेंडर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राजपाल तुरुंगात जाऊन सरेंडर झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics: इकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, तिकडे मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंच्या आमदाराला 'प्रपोजल'; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; आता पुण्यात FDA ने टाकली धाड

Sunday Horoscope : पार्टनर साथ देईल, लाईफस्टाईल बदलेल; ५ राशींच्या लोकांच्या जीवनातील समस्या क्षणात होतील दूर

SCROLL FOR NEXT