Satish Kaushik  Facebook
मनोरंजन बातम्या

अभिनेते सतिश कौशिक एअरलाइनवर भडकले; केले 'हे' गंभीर आरोप

Satish Kaushik News : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक यांनी त्यांचा एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना अनेकांना कडवट अनुभव येत असतात. तर असेच काही अनुभव कलाकरांनाही येतात. असाच प्रकारचा अनुभव बॉलिवूडमधील ( Bollywood ) निर्मात्याला आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik ) यांनी त्यांचा एक विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांनी एअरलाइनवर ( Airline ) चुकीच्या पद्धतीने पैसे कमावल्याचा आरोप लगावत त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. या आरोपावर त्यांनी तपशीलवार वर्णन करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. (Satish Kaushik Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

अभिनेते सतीश कौशिक यांनी गो फर्स्ट एरलाइनवर गंभीर आरोप केले आहेत. कौशिक म्हणाले,'गो फर्स्ट एअरलाइनने प्रवाश्यांकडून गैर मार्गातून पैसै लुटण्याचा मार्ग सुरू केला आहे. माझ्या कार्यालयातून (सतीश कौशिक/ अजय राय ) यांनी पहिल्या रांगेतल्या सीट या २५ हजार रुपये देऊन बुक केल्या होत्या. कार्यलयाने त्यासाठी सर्वात आधी पैसे दिले होते. तरीही त्या सीट जुबिन नामक प्रवाश्यांना विकल्या आहे.'

सतिश कौशिक हे या प्रकरानंतर चांगलेच संतापले आहेत. कौशिक पुढे म्हणाले, 'या एअरलाइनचा एका प्रवाशाला त्रास देऊन पैसे कमावण्याचा कोणता मार्ग आहे ?' असा सवाल त्यांनी गो फर्स्ट एअरलाइनला केला आहे. 'माझ्या कार्यलयातील टीमने एअरलाइनशी संपर्क साधून पैसे परत मिळवण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु त्यावर बोलण्यास एअरलाइनने टाळाटाळ करत पैसे परत देण्यास नकार दिला. खरं तर हा मुद्दा परत पैसे मिळवण्याचा नसून आमचं म्हणणं ऐकण्याचा आहे. या प्रकारानंतर मी फ्लाइट रोखू शकलो असतो,परंतु इतर प्रवाश्यांचा विचार करून फ्लाइट रोखण्याचा प्रकार केला नाही'.

दरम्यान, सतीश कौशिक यांच्यासोबत झालेली घटना त्यांना खूपच त्रास देणारी आहे. त्यांनी पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा पाठिंबा मिळत आहे. सतीश कौशिक हे सिनेसृष्टीत साधे आणि निर्मळ स्वभावासाठी ओळखले जातात. कौशिक यांची रुप की रानी चोरों का राजा, कागज, ढोल आणि तेरे नाम यांसारखे सुपरहिट सिनेमांचे निर्माते आहेत. कौशिक यांच्यासोबत झालेल्या प्रकारानंतर एअरलाइनतर्फे काय कारवाई करण्यात येईल, हे पाहावे लागणार आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीत आंदोलन झालं त्यासाठी मनोज जारांगेना जागा मी देण्यास मदत केली - धंनजय मुंडे

Dhananjay Munde: मला मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी, जरांगेंच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Dry Lips Care: तुमचेही ओठ खूपच कोरडे होतायेत? या सोप्या टिप्स करा फॉलो

Budh Gochar 2025: डिसेंबर महिन्यात २ वेळा गोचर करणार राजकुमार बुध; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार करोडपती

Lehenga Selection: लग्नसराईसाठी लेहेंगा खरेदी करायचा आहे? मग शॉपिंगला गेल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT