Pratik Gandhi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pratik Gandhi : "धर्म इतका कमकुवत नाही की...", सलमान खानच्या राम मंदिर घड्याळाच्या वादावर प्रतीक गांधीची रोखठोक प्रतिक्रिया

Salman Khan Ram Mandir Watch Controversy : अलिकडेच सलमान खान त्याच्या राम मंदिर घड्याळामुळे चर्चेत होता. आता या प्रकरणात सुप्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सुप्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi )लवकरच मोठ्या पडद्यावर ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा 'फुले' चित्रपट 11 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान त्याला सलमान खानच्या (Salman Khan Ram Mandir Watch Controversy) राममंदिर घड्याळाचा वादावर प्रतिक्रिया विचारली, त्यावर प्रतीक गांधी नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात.

प्रतीक गांधी नेमकं काय म्हणाला?

प्रतीक गांधी उत्तर देत म्हणाला की, "लहानपणी शाळेत आणि वडीलधारी मंडळींनी आपल्याला शिकवले आहे की, कोणताही धर्म इतका लहान किंवा कमकुवत नसतो की, तो एका रंगाला, एका गोष्टीला किंवा एका प्रथेला बांधून राहतो. हा मुद्दा निर्माण करणारे काही लोक आहेत, ज्यांनी धर्माचा ठेका स्वतःवर घेतला आहे. हे प्रत्येक धर्मात घडते. फुले ज्या जातीचे होते, लोक त्यांच्या सावलीपासूनही दूर रहायचे. "

पुढे तो म्हणाला की, "आमच्या चित्रपटात जेव्हा एका गोष्टीला घेऊन उच्च जातीचे लोग फुलेंना म्हणतात की, "तुम्ही धर्माविरुद्ध प्रश्न उपस्थित करत आहात. " तेव्हा फुले म्हणतात की, "मी धर्माविरुद्ध कोणतेही प्रश्न उपस्थित करत नाही. मी फक्त तुमच्या धर्माच्या करारावर प्रश्नचिन्ह करत आहे. एकीकडे आपण म्हणतो की, आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे. पण असे वाद निर्माण करून आपण कुठे पोहोचलो आहोत हे समजून घेतले पाहिजे."

सध्या सलमान खान त्याच्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच 'सिकंदर' चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. सलमान खानच्या चर्चित घड्याळ्याच्या डायलवर अयोध्येतील राम मंदिर दिसत असून त्यात भगवान राम आणि हनुमान दिसत आहेत. यावरून मोठा वाद निर्माण झाला. सलमान खानच्या राम एडिशन घड्याळावर उत्तर प्रदेशातील मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी संताप व्यक्त केला. "सलमान खानने राम एडिशनचं घड्याळ हातात घालणं योग्य नाही" असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT