Prakash Raj Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prakash Raj : इंडस्ट्रितील कलाकारांना प्रकाशसोबत काम करायचे नाही, व्यक्त केले परखड मत

देशभरात सुरु असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश आपले मत मांडत असतात. चित्रपटसृष्टीतील काही कलाकारमंडळी त्यांच्या राजकीय विचारांमुळे त्यांच्यासोबत काम नाकारतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Prakash Raj: प्रकाश राज हे बॉलिवूड (Bollywood) सिनेविश्वातील एक उत्तम अभिनेते आहेत, आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. कायमच खलनायकाच्या भूमिकेत असल्याने सोशल मीडियावर त्यांच्या भूमिकेची चर्चा होते. त्यासोबतच राजकीय विषयांवर मन- मोकळेपणाने बोलणारा अभिनेता अशी त्याची ओळख नेहमीच आहे.

देशभरात सुरु असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश आपले मत मांडत असतात. चित्रपटसृष्टीतील काही कलाकारमंडळी त्यांच्या राजकीय विचारांमुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी स्पष्ट नकार दर्शवतात. प्रकाश यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत दिली होती तेव्हा सांगितले की, 'राजकीय कारणांमुळे माझे काम आणि माझे नाते प्रभावित होत आहे. इंडस्ट्रीत असे काही लोक आहेत ज्यांना आता माझ्यासोबत काम करायचे नाही.

त्यांनाही आपले परखड मत स्पष्ट करण्यासाठी कोणी थांबवले नाही. मला या सर्व गोष्टींचा काहीच परिणाम पडत नाही. नाही. मी इतका ताकदवर आहे की, हे सर्वकाही मी सहन करू शकतो. फक्त मला एकच गोष्ट कायम वाटते की, माझी कमजोरी इतरांची ताकद बनू नये. प्रकाश राज यांच्या या विधानाची अभिनयक्षेत्रात चर्चा रंगताना दिसत आहे.

प्रकाश राज यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली आहे, तेव्हा ते म्हणाले की, 'मी मांडत असलेल्या विचाराचा मला खेद वाटत नाही. तेव्हा लोक मला माझ्या भूमिकेमुळे ओळखत होते, मी कोणत्या प्रकारची भूमिका साकारतो त्यामुळे नाही. सहाजिकच हे केल्याबद्दल आपल्याला याचा त्रास सहन करावा लागेल आणि मी त्याचा फटका सहन करण्यास तयार आहे.

इंडस्ट्रीत असे अनेक लोक असतील ज्यांना तोंड उघडायचे नाही. असे अनेक कलाकार आहेत जे शांत राहतात. मी त्यांना दोष देऊ इच्छित नाही. मणिरत्नम दिग्दर्शित बिग बजेट चित्रपट 'पोनियिन सेल्वम' मध्ये प्रकाश दिसला होता. याशिवाय त्याची मुखबीर ही वेबसिरीजही प्रदर्शित झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

Maharashtra Live News Update: काँग्रेस वंचित बहुजन आघाडीशी युती करणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

SCROLL FOR NEXT