Saleel Kulkarni: मराठीतील प्रसिद्ध संगीतकार हिंदी मालिकेच्या सेटवर, आभार मानत शेअर केली पोस्ट

सलील कुलकर्णी प्रेक्षकांसाठी नवीन काय घेऊन येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहेच. पण त्याआधी सलील कुलकर्णी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सेटवर पोहचले आहेत.
Saleel Kulkarni Set On TMKOC
Saleel Kulkarni Set On TMKOC Instagram/ @saleelkulkarniofficial

Saleel Kulkarni: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेची कलाकारांमुळे सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या मालिकेच्या सेटवर नुकताच मराठी चित्रपटसृष्टीवरील प्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी गेला होता. सलील कुलकर्णीच्या गाण्यांचा, संगीताचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. सलीलने 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

Saleel Kulkarni Set On TMKOC
Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच भावला आहे.

या चित्रपटानंतर त्याची कोणती आगामी कलाकृती येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेच्या सेटवर गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णीने तेथील कलाकारांनाही भेट दिली.

बऱ्याचदा प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी विविध विषयांवर भाष्य करत असतो. सोशल मीडियावर नेहमीच डॉ. सलील कुलकर्णी सक्रिय असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यावेळी त्याने जेठालाल सोबत म्हणजे दिलीप जोशीसोबत एक फोटो शेअर केला आहे.

Saleel Kulkarni Set On TMKOC
शुभमन करतोय साराला डेट, मग तर चर्चा होणारच; क्रिकेटरनेच उघड केले सत्य

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सलील कुलकर्णी म्हणतो, “मुलांच्या लहानपणीचे आणि माझ्या बाबापणाचे अनेक क्षण सुंदर करणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा. परवा एका शूटिंगसाठी मी आणि शुभंकर गेलो आणि अचानक समोर गोकुळधाम दिसलं.

मग मंदार चांदवडकर ने अतिशय प्रेमाने आमची सेटवर जायची सोय केली आणि आपल्या लाडक्या जेठालालची भेट झाली. पुन्हा एकदा मुलं लहान झाली आणि त्या मालिकेने दिलेल्या सुंदर क्षणांचे मी मनापासून आभार मानले.” या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com