Anushka Sharma: अनुष्का शर्मा आंतरराष्ट्रीय ब्रॅंडची अॅम्बेसेडर, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

अनुष्का अनेक भारतीय उत्पादनांचीही ब्रँड ॲम्बेसेडर असून अभिनेत्री अनुष्का शर्मा एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर झाली आहे.
Anushka Sharma
Anushka Sharma Instagarm/ @anushkasharma

Anushka Sharma: काही वर्षात बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच चर्चेत आहे. त्यातल्या त्यात हॉलिवूडमध्ये तर त्यांची बरीच चर्चा होत आहे. दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा या दोघींनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने हॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये छाप सोडली आहे. प्रियांका हॉलिवूड चित्रपटांमध्ये असून दीपिका ही हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी दीपिका एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर होत फोटोशूट केले होते.

Anushka Sharma
Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात बुध्दिबळाचा डाव, ट्विस्टमुळे स्पर्धकांमध्ये रंगला खेळ

तिच्याप्रमाणे बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री ब्रँड ॲम्बेसेडर झाल्या होत्या. त्या यादीत पुन्हा एका अभिनेत्रीची भर पडली आहे. आता अभिनेत्री अनुष्का शर्मा एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर झाली आहे. अनुष्का अनेक भारतीय उत्पादनांचीही ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तिला आपण अनेकदा काही जाहिरातींमध्ये पाहिले आहे. सध्या ती चित्रपट सृष्टीपासून दूर असून लवकरच एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

तिचे गेल्या काही दिवसांपूर्वी शूटिंग दरम्यानचे खास फोटो व्हायरल झाले होते. जरी अनुष्का चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसली तरी जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अमेरिकेतील लोकप्रिय ब्रँड 'मायकल कोर्स'ने अनुष्का शर्माला आपले भारतातील ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे. अनुष्काला पहिल्यांदाच एका आंतरराष्ट्रीय कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर बनली नसून यापूर्वी ही ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे.

Anushka Sharma
Bipasha Basu: घर आई एक नन्ही परी, बिपाशा बसूला मिळाला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

मायकल कोर्स हा अमेरिकेतील सुप्रसिद्ध 'मायकल कोर्स' या फॅशन डिझायनरने ब्रँड तयार केलेला आहे. हा ब्रँड महिला आणि पुरुषांसाठी घड्याळ, फुटवेअर, ज्वेलरी अशा विविध गोष्टींची निर्मिती करतो. आता या ब्रँडला भारतातही आपला जम बसवायचा आहे. त्याकरिता कंपनीने भारतातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्माची आपल्या ब्रँड अॅम्बेसिडर पदी निवड केली आहे. नुकताच तिने या कंपनीसोबत करार केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com