Paresh Rawal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Paresh Rawal : "गळ्याला लागलेला फास...", परेश रावल का कंटाळले बाबुरावला?

Paresh Rawal- Baburao Character : बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांचे बाबुराव हे पात्र आजही प्रचंड गाजत आहे. मात्र आता 'बाबुराव' या पात्रावर परेश रावल यांनी मोठे विधान केले आहे. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या बॉलिवूडचे कॉमेडी किंग अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगलचे चर्चेत आहे. त्यांचा 'हेरा फेरी 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हेरा फेरी' चित्रपटातील बाबुराव हे पात्र खूप गाजले. या पात्राला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आहे. आजही हे पात्र चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. नुकत्याच एका मिडिया मुलाखतीत परेश रावल यांनी बाबुराव (Baburao Character ) या पात्रासंबंधित मोठे विधान केले आहे. त्यांचे हे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिडिया मुलाखतीत परेश रावल यांनी "माझी 'हेरा फेरी' मधील भूमिका 'गले का फंदा' आहे." असे विधान त्यांनी केले आहे. मुलाखतीत परेश रावल यांना 'हेरा फेरी' चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, मला बाबू भैय्या या पात्रापासून मुक्ती हवी आहे. आपली 'बाबुराव' भूमिका सोडण्यासाठी परेश रावल यांनी दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि आर. बाल्की यांच्याशी संवाद साधला.

पुढे परेश रावल म्हणाले की, "हेरा फेरी चित्रपटातील बाबुरावची भूमिका माझ्या गळ्याला लागलेला फास आहे. मी विशाल भारद्वाज यांना म्हणालो होतो की, मला हेरा फेरीमधील बाबुरावपासून मुक्ती द्या. सेम गेटअपमध्ये मला वेगळा रोल देऊ शकता का? त्यानंतर मी 2022 मध्ये आर बल्की यांना म्हणालो की, "मला याच गेटअपमध्ये दुसरे पात्र द्या. ही भूमिका करताना माझी घुसमट होत आहे."

'हेरा फेरी 3' हा चित्रपट 'हेरा फेरी' फ्रॅन्चायजीचा तिसरा भाग आहे. 'हेरा फेरी' चित्रपट 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2006ला 'फिर हेरा फेरी' चित्रपट रिलीज करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 'हेरा फेरी 3' येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'हेरा फेरी 3' नवीन वर्षात 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'हेरा फेरी 3' साठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT