Pankaj Tripathi Talk About His Parents Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pankaj Tripathi Interview: 'मी काय करतो हे आईला माहीत नव्हते!'; पंकज त्रिपाठींनी आईच्या आठवणींना दिला उजाळा

Chetan Bodke

Pankaj Tripathi Talk About His Parents

बहुआयामी, अभ्यासू आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. 'मिर्जापूर', 'बरेली की बर्फी', 'गुंजन सक्सेना' अशा वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृतींतून पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. सध्या अभिनेते पंकज त्रिपाठी आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच त्याने मुलाखतीमध्ये, आपल्या आईविषयी भाष्य केले. त्याला गेल्या वर्षी नॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. तो स्विकारण्याआधीच त्याच्या आईचे निधन झाले. (Bollywood)

अलीकडेच अभिनेत्याने इंडिया टुडेला मुलाखत दिली, यावेळी अभिनेते पंकज त्रिपाठी मुलाखतीमध्ये म्हणाले, "आईच्या जाण्याने मन सुन्न झाले होते. माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड जिंकणं हे एक स्वप्नवत होते. पुरस्कार मिळणे हे खूप मोठे यश आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळावा ही माझी इच्छा होती. मी ज्यावेळी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनय शिकत होतो, त्यावेळी राष्ट्रीय पुरस्कराने आशीष विद्यार्थींना सन्मानित करण्यात आले होते." (Bollywood Actor)

पुढे पंकज त्रिपाठी आपल्या मुलाखतीमध्ये म्हणाले, " आशीष विद्यार्थांनंतर मनोज त्रिपाठींना 'पिंजरा' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कर मिळाला होता. तेव्हापासून मलाही त्या पुरस्काराबद्दल फार उत्सुकता होती." यानंतर आपल्या आई-वडिलांबद्दल बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाले, "मी काय करतो आणि मी आयुष्यात कोणते यश मिळवले आहे याची माझ्या आई-वडिलांना कधीच कल्पना नव्हती. माझी आई माझ्यासोबत काही दिवस मुंबईत राहात होती. पण, ती मला रोज गावी परत जायचंय असं म्हणायची. तिला साधेपणाने राहण्याची सवय होती. तिला हे देखील माहिती नव्हते की, मी पॉप्युलर अभिनेता झालो आहे.."

पंकज त्रिपाठी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, येत्या १९ जानेवारी पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘मैं अटल हूं’ चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पात्र ते साकारणार आहेत. सध्या या बायोपिकच्या प्रमोशनमध्ये पंकज त्रिपाठीसह सर्वच चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतंच पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाच्या 'नॅशनल आयकॉन' पदाचा राजीनामा दिला आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT